पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१९६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


काम करण्याची पध्दत लक्षात घेण्यात तो अकार्यक्षम ठरला.त्यामुळे त्याचं कामंही निरर्थक ठरलं. यावरून संबंध जपण्याबाबतची जाणीव म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल.आपल्या सहकाच्यांबाबतही असंच असतं. ते तुमच्या पध्दतीनं नव्हे, तर त्यांच्या पध्दतीनं कार्य करतात आणि प्रत्येकाची क्षमता भिन्न असते. त्यांच्याशी जुळवून घेताना या सर्व बाबी ध्यानात घ्याव्या लागतात.
संपर्काची जबाबदारी :
 एकच काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये पुरेसा संपर्क असणंं आवश्यक आहे. संपर्क नसल्यामुळंं गैरसमज निर्माण होतात. आपण काय करीत आहोत, सहकाच्याचं काय चाललं आहे याचा ताळमेळ संपर्क असल्याशिवाय साधता येत नाही.

 पूर्वीप्रमाणे सध्या कोणतीही संस्था केवळ नियम व शिस्त यांच्यावर चालू शकत नाही. नव्या युगातील संस्था परस्पर विश्वासावर चालते. संपर्क सुयोग्य असेल तरच विश्वासाचंं वातावरण निर्माण होतंं. त्यामुळंं समूहनं कार्य करणाच्या प्रत्येकानं सहकाऱ्यांंशी संपर्क प्रस्थापित करण्याची जबाबदारी स्वीकारणंं आवश्यक आहे, ही शिस्त लावून घेणंं हा स्वयंव्यवस्थापनाचाच एक भाग आहे.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१८७