पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१९४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वयंव्यवस्थापनाची शैली


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

यंव्यवस्थापनातील शेवटची दोन महत्त्वाची तत्त्वं म्हणजे आपलं योगदानमूल्य ओळखणंं आणि समूहाचा भाग म्हणून काम करण्याची तयारी ही आहेत.‍‌‌‍'थेंंबे थेंंबे तळे साचे' ही म्हण आपल्या परिचयाची आहे. एखाद्या कार्यात प्रत्येकानं आपल्या कुवतीप्रमाणं आणि आपल्यावरील जबाबदारीनुसार योगदान केल्यानं ते काम झटपट आणि सुबक पध्दतीनं होतं, तसेच त्यापासून फलनिष्पत्तीही अपेक्षेप्रमाणंं, काही वेेळा अपेक्षेपेक्षाही अधिक होते. त्यामुळे आपलंं योगदान कोणतं, किती आणि कसं असावं हा प्रश्न प्रत्येकानंं स्वत:ला विचारला पाहिजे. मात्र प्रत्यक्षात बहुतेक जण या प्रश्नांचा सखोल विचार करीतच नाहीत. केवळ सांगितलं म्हणून केलं, असं सांंगकाम्यासारखं काम करण्याची बहुतेकांची पध्दत असते.

 कित्येकदा वरिष्ठांनाही असंच काम करणारे कर्मचारी हवे असतात. प्रत्येकानं सांगितलेलं काम सांगितलेल्या पध्दतीनंं केलं की ते आपोआप होतं अशी त्यांची समजूत असते. ती चुकीची आहे असं नाही. ते समजून-उमजून करावं याला व्यवस्थापनानं महत्त्वं दिल्यास ते अधिक फायद्याचं ठरतंं.
 सध्या शारीरिक श्रमांच्या कामापेक्षा बौध्दिक कामाचं महत्त्वं वाढलं आहे. असं काम करणाच्या कर्मचाऱ्यांना ज्ञानप्रधान कर्मचारी (नॉलेज वर्कर्स) अशी संज्ञा आहे. अशी बौध्दिक कामंं करणाऱ्यांनी 'माझं योगदान कोणतं असावं’ हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
 या प्रश्नाचं उत्तर तीन बाबींवर अवलंबून आहे. एका परिस्थितीची गरज कोणती आहे, दोन आपली शक्तिस्थानं, आपली कार्यपध्दती आणि आपले आदर्श यांचा मेळ घालून जास्तीत जास्त योगदान मी कसं करू शकेन आणि तीन, काम परिपूर्ण होण्यासाठी माझ्या योगदानातून कोणती फलनिष्पत्ती अपेक्षित आहे? या तीन प्रश्नांच्या उत्तरातून आपल्या योगदानाचं मूल्य किती याची नेमकी माहिती मिळू शकते आणि योगदानात प्रगती साधता येते.

 केवळ सर्वांनी मिळून एखादं काम करणंं म्हणजे योगदान असा अर्थ होत नाही.

अद्भु्त दुनिया व्यवस्थापनाची / १८५