पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१८९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

सुधारण्यासाठी वेळ व शक्ती खर्च करणं योग्य ठरणार नाही. त्याऐवजी तोच वेळ व शक्ती त्यानं फलंदाजी अधिक भक्कम करण्यासाठी वापरली तर त्या क्षेत्रात तो उच्चपदावर पोहोचू शकतो.
 कामगिरीचे इंगित जाणणे :
 एकच काम करण्याची प्रत्येकाची पध्दत भिन्नभिन्न असते. ज्याने त्याने ती स्वतःच्या कुवतीनुसार ठरविलेली असते. अशा स्वयंरचित पध्दतीने काम केल्यास ते चांगलं होण्याची शक्यता अधिक आहे. दुसऱ्याच्या पद्धतीने ते केल्यास बहुतेक वेळा अपयश पदरी पडतं. चांगल्या कामगिरीचं इंगित हेच आहे. त्यामुळं कामाचं स्वरूप नीट समजून घेऊन ते करण्याची स्वतंत्र पध्दत बसविण्याचा प्रयत्न करावा. विशेषत: बौध्दिक कामं करणाऱ्यांसाठी हे सूत्र अधिकच उपयुक्त आहे.
 कामगिरीवर आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण पडणं साहजिक असतं. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण स्वभाव व बौद्धिक क्षमता यावर अवलंबून असते. त्यामुळं कामाचं स्वरूप पाहून व्यक्तिमत्त्वात थोडा फेरफार करता येतो, पण ते पूर्णपणे बदलून टाकणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळं आपल्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप अशी कामाची पद्धत ठरवून घ्यावी आणि दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा याच स्वतः ठरविलेल्या पध्दतीने काम केल्यास ते यशस्वी होते.
 चांगली कामगिरी आपण शिकतो काय व कसं यावर अवलंबून आहे. कित्येकदा असं दिसून येतं की, शाळेत कधीही चांगले गुण न मिळालेल्या व्यक्ती मोठेपणी विश्वविख्यात शास्त्रज्ञ, लेखक, कवी इत्यादी होतात. (हजाराहून अधिक शोध लावणाऱ्या थॉमस अल्वा एडिसन याला शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं..) याचं कारण असं की, शाळेतील शिक्षणाची पद्धती त्यांच्या स्वयंभू व्यक्तिमत्त्वाशी मिळतीजुळती नसते. शाळेत केवळ ऐकणं आणि वाचणं या दोनच मार्गानी शिक्षण दिलं जातं. त्यामुळं शाळेत त्यांची कामगिरी चांगली होत नव्हती. मात्र पुढं जगाच्या शाळेत प्रवेश केल्यानंतर अनुभावानं मिळालेल्या शिक्षणानं त्यांचं व्यक्तिमत्त्व खुललं आणि तो जगप्रसिध्द बनला.
 शिकायचं कसं हे समजून घेणं एकवेळ सोपं आहे. मी जेव्हा लोकांना विचारतो की, तुम्ही शिकता कसे तर याचं उत्तर बहुतेकांना देता येतं. पण शिक्षणातून मिळणारं ज्ञान आचरणात आणता का, या प्रश्नाला होकारार्थी उत्तर देणाऱ्यांची संख्या अगदीच कमी असते. ज्ञानाचा जास्तीत जास्त हिस्सा आचरणात आणण्यावरच कामगिरीची गुणवत्ता अवलंबून असते.

 स्वतःचं व्यवस्थापन उत्तम प्रकारे करावयाचंं असेल, तर तुम्ही स्वतःला दोन प्रश्न विचारले पाहिजेत. एक, मी इतरांसमवेत काम चांगलंं करू शकतो की एकटा करू शकतो की एकटा करू

स्वयंव्यवस्थापन (भाग २)/१८०