पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१८७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परीक्षा शिकवणी सुरू झाल्यापासून साधारण एक वर्षाने असते. त्यामुळं पहिल्या तीन महिन्यांपर्यंत स्वतःवर प्रयोग करण्यासाठी आपल्याला संधी असते. या कालावधीत आपण शिकवण्यात तरबेज झालो की, पुढचे नऊ-दहा महिने विद्यार्थ्यांचा हवा तितका फायदा होऊ शकतो.

 स्वतःचं शक्तिस्थान जाणणं आणि ते बलवान करणं यासाठी योजनाबध्द प्रयनांची गरज असते. आपल शक्तिस्थान एकच असेल किंवा असावं असंही नाही. एकाच व्यक्तीत दोन-तीन कौशल्ये असू शकतात.त्या सर्वांचा विकास अशाच पध्दतीनं करता येतो. कालांतरानं त्यापैकी एकाची निवड करून त्यात करिअर करता येतंं. स्वयंव्यवस्थापनाचा हा एक पैलू झाला. पुढच्या लेखात आणखी काही मुद्यांचा परामर्श घेऊ.

स्वयं व्यवस्थापन: २१ व्या शतकाची गरज/१७८