पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


मिळवला दोन्ही धर्मानी ज्यू धर्मावर असंख्य आक्रमणं केली आणि दुसच्या सहस्त्रकाच्या उत्तरार्धापर्यंत ज्यूना बचावात्मक धोरण स्वीकारण्यास भाग पाडले.
दुसरं सहस्त्रक :
 याही सहस्त्रकात इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या लढाया चालूच राहिल्या. भारतात इस्लामचा प्रवेश हे या सहस्रकाचे आणखी एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य. मोगलांच्या काळात जवळपास पूर्ण भारत इस्लामी राजवटीच्या ताब्यात गेला. हे वर्चस्व अखेरीस पाश्चिमात्य शक्तींनी मोडून काढलं व सहस्त्रकाचा शेवटच्या शतकात ब्रिटिशांनी भारतावर एक हाती राजकीय सत्ता स्थापन केली.
 या सहस्त्रकाच्या सुरुवातीला युरोप व पश्चिम आशिया ख्रिश्चन व इस्लामी जणू वाटून घेतला होता. कधी शांतता तर कधी संघर्ष असे त्यांच्यातील संबंध होते. मात्र या सहस्रकातील शेवटच्या ३०० वर्षांत युरोपात वैज्ञानिक क्रांती झाली. यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा विकास होऊन आधुनिक शास्त्र विकसित झाली. त्यामुळे इस्लामला मागं सारून ख्रिश्चन संस्कृती जगभर आघाडीवर आली. हा पुढावा दुसऱ्या सह्स्त्रकाच्या अखेरपर्यंत कायम राहिला.
 याच सहखकाच्या उत्तरार्धात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मानवी संस्कृतीची दिशा बदलली. शेकडो वर्षे एक ‘सामाजिक प्राणी' म्हणून जगणारा मानव औद्योगिक क्राांंतीमुळे ‘आर्थिक प्राणी’ बनला. त्यामुळे धार्मिक किंवा सामाजिक वर्चस्वाखाली होणारी युध्द आणि राजकारणे थांबली; आर्थिक वर्चस्वासाठी झगडे सुरू झाले. यात भाडवलशाहीविरुध्द साम्यवाद हा संघर्ष क्रांतिकारक ठरला. औद्योगिक क्रांतीपूर्वी जग धर्मानी आपसांत विभागून घेतलं होतं. औद्योगिक क्रांतीनंतर ते भांडवलशाही आणि साम्यवाद असं विभागलं. ही विभागणी साधारण ७० वर्षे टिकली.
 दुसऱ्या सहस्रकाच्या अखेरीस भांडवलशाहीनं साम्यवादावर निर्णायक मात केली. अवघ्या दशकापूर्वी स्वत:ला अभिमानानं साम्यवादी म्हणवून घेणारी आणि भांडवलशाहीला हिणवणारी राष्ट्रंं भांडवलशाहीचा बिनदिक्कत स्वीकार करून मोकळी झाली‘काळाची गरज अशा शब्दांत या परिवर्तनाचं समर्थनही केले जाऊ लागलंं.
 भांडवलशाही हे लवचिक व प्रवाही तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे अन्य तत्त्वज्ञानांतील सोयीच्या बाबींचा स्वीकार करून तिनं स्वत:तील दोषांची तीव्रता कमी केली. उदाहरणार्थ,कामगार व गरीब वर्गाचं शोषण हा भांडवलशाहीचा सर्वात कच्चा दुवा आहे. तथापि, कल्याणकारी राज्य’ या संकल्पनेचा स्वीकार करून यां वर्गाच्या शोषणावर लगाम घालण्यात भांडवलशाही राष्ट्रे यशस्वी ठरली.

 भांडवलशाहीचा सांधा लोकशाहीशी जुळतो. साम्यवाद मात्र राजकीय हुकूमशाहीशिवाय

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/१६७