पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१७५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नूतन सहस्रकातील व्यवस्थापन

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

ळाची विभागणी प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या सोयीनुसार करीत असतो. प्रत्येक कालखंडात घडलेल्या घटनांचे विश्लेषण करण्यासाठी अशी विभागणी केली जाते. इंग्रजी कालगणनेनुुसार सध्या आपण तिसऱ्या सहस्रकात प्रवेश केला आहे. या सहस्रकातील व्यवस्थापनाचं स्वरूपं कसं असेल, याची उत्सूकता सर्वांनाच आहे. मात्र नूतन सहस्रक काही एकदम उगवलेलं नाही. त्याला पहिल्या व दुसन्या सहस्त्रकाची पाश्र्वभूमी आहे.या दोन सहस्त्रकांमध्ये घडलेल्या सामाजिक व सांस्कृतिक घडामोडींंमधून तिसच्या सहस्रकाचा पाया घातला गेला. तेव्हा नूूतन सहस्रकातील व्यवस्थापन शैैलीसंबंंधी विवेचन करताना पहिल्या दोन सहस्रकांचा परामर्ष घेणे आवश्यक आहे.

 पहिल्या सहस्रकापासून म्हणजेच सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी मानवी संस्कृती सुसंबध्द व सविस्तर इतिहास लिहून अगर नोंदवून ठेवण्याची पध्दत सुरू झाली.या पहिल्या सहस्रकापूर्वी जगात रोम, चिनी, इजिप्शियन व भारतीय अशा चार संस्कृती अस्तित्वात होत्या. त्यांचं संपूर्ण जगावर राजकीय आणि तात्विक वर्चस्व होतंं.
पहिले सहस्रक :
 पहिल्या सहस्रकातं युरोप आणि पश्चिम आशियामध्ये पारंपरिक रोमन व इजिप्शीयन संस्कृती ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मानी गिळून टाकले.तर भारतीय आणि चिनी संस्कृतीसमोर बौध्द धर्म व जैन धर्म यांनी आव्हान उभं केलं.तथापि ,भारतात सनातन हिंदू धर्मानं बौध्द आणि जैन तत्वज्ञानांना आपल्यात सामावून घेतलं. बौध्द धर्म संस्थापक भगवान गौतम बुध्द हिंदूंंनी भगवान विष्णूचा नववा अवतार मानलंं. यामुळे बौध्द तत्त्वज्ञान हा बृहत हिंदू तत्त्वज्ञानाचा एक भाग बनला. साहजिकच भारतीय उपखंडात बौध्द तत्त्वज्ञानाचा स्वतंत्र प्रभाव जवळ जवळ नाहीसा झाला.

 भारतात जन्माला आलेला बौध्द धर्म चीनमध्ये पसरला. तिथल्या' कन्फ्युशियस व ताओ तत्त्वज्ञानाशी त्याचा विशेष संघर्ष न होता संयोग झाला. मात्र,युरोप व पश्चिम आशियात खिश्चन व इस्लाम यांच्यात याच सहस्रकाच्या उत्तरार्धात रक्तरंजित लढाया झाल्या. इ.स. ६५० पर्यंत मध्यपूर्वेवर इस्लामी तर युरोपवर खिश्चन धर्मानं कब्जा

नूतन सहस्रकातील व्यवस्थापन/१६६