पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

युग बदलत्या संबंधांचं

णी म्हणतं सध्याचं युग 'संगणक युग' आहे तर कुणाच्या दृष्टीनं हे 'अणू युग' असतं. 'विज्ञानयुग' तर ते आहेच. 'सध्या'चं काहीच पसंत नसणारी मंडळी याला 'कलियुग' मानतात, पण माझ्या दृष्टीनं हे 'बदलत्या संबंधांचं युग' आहे. संगणक, अणुतंत्रज्ञान यापासूनच आजही जगातला बहुसंख्य समाज दूरच गेलेला आहे. विज्ञानाचे फायदेही न मिळणारा जनसमुदाय मोठा आहे, पण पारंपरिक पध्दतीनं चालत आलेल्या संबंधांमध्ये विसाव्या शतकात जे आमूलाग्र बदल झाले आहेत, त्याचा परिणाम सर्वांवरच होतोय. त्यामुळं 'बदलणाऱ्या संबंधाचं'युग हेच याचं यथार्थ वर्णन ठरेल. व्यवस्थापन शास्त्र हे मुख्यतः ‘परस्पर संबंधांचं’ शास्त्र असल्याने प्रत्येक व्यवस्थापकाला हे बदलते संबंध लक्षात घ्यावे लागतात.

 गेली हजारो वर्षे मानवी संस्कृतीचा डोलारा तीन प्रकारच्या मूलभूत संबंधांनी सांभाळला आहे. एक जन्मदाते - अपत्य संबंध (यातूनच घर ही संस्था अस्तित्वात आली.) दोन पती-पत्नी संबंध (यातून सर्व रक्ताची नाती निर्माण होतात.) आणि तीन मालक - सेवक संबंध (यातून सर्व आर्थिक नाती निर्माण होतात.) मानवी संस्कृती सुस्थापित झाल्यापासून सुमारे दहा हजार वर्षे हे संबंध एका विवक्षित पध्दतीनंच विकसित होत असत. यालाच परंपरा म्हणतात.
 तर अशा या पारंपरिक संबंधांमध्ये विसाव्या शतकात फार मोठं आणि क्रांतिकारक (चांगल्या व वाईट दोन्ही अर्थानं) परिवर्तन झालं आहे. ही प्रक्रिया २१ व्या शतकातही चालू राहणार आहे. संपूर्ण समाज जणू या बदलामुळं ढवळून निघाला आहे. संस्कृती, नीती, चारित्र्य, चांगुलपणा आणि वाईटपणा यांच्या व्याख्या बदलण्याचं साम्यर्थ या बदलांमध्ये आहे. त्यांच्याबरोबरच या संबंधांशी संलग्न असणाऱ्या सर्व व्यवहारांमध्येही व्यापक उलथापालथ होत आहे.

 पिता-पुत्र संबंधांचंच पाहा. मुलानं बापाचं ऐकायचं आणि त्यानं केलं तेच आपण पुढे चालवायचं, हा या संबंधाचा परंपरेने चालत आलेला पाया. बाप हा बुध्दी आणि शहाणपण यात मुलापेक्षा श्रेष्ठ असतो ही संकल्पना यामागे आहे. जुन्या काळी ज्ञानप्राप्ती अत्यंत सावकाश होत असे. त्यामुळं पिता व पुत्र यांच्या ज्ञानात बरंच मोठं

व्यवस्थापकाचे गुणधर्म / १६०