पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६२

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापन शैलीत बदल आवश्यक

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

श्चिमात्य व्यवस्थांवरील चर्च संस्कृतीचा परिणाम आणि त्यामुळे निर्माण झालेली शिस्तबध्द आक्रमकता यांचा आढावा आपण मागच्या लेखात घेतला. बहुराष्ट्रीय कंपन्या या संस्कृतीच्या आधारे भारतात आपलं जाळं कसं पसरवीत आहेत याचाही विचार केला. पाश्चात्य व्यवस्थापनाप्रमाणे भारतीय व्यवस्थापनावरही आपल्या आध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरेचा पगडा आहे. तो कसा हे पाहण्यासाठी ही परंपरा कालांतराने त्यात झालेले बदल यांचा मागोवा घेणे आवश्यक आहे.

 प्राचीन भारतीय संस्कृती, विज्ञान व व्यवसाय यांचा विस्तार भारताच्या सध्याच्या सीमांबाहेरही मोठ्या प्रमाणावर झाला होता याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. समद्रामार्गे प्रवास करण्याचे शास्त्रही भारतीयांना अवगत असल्याने जगातील विविध जनसमुदायांबरोबर व्यापार करणंं शक्य होत असे. त्यामुळे भारतीय भूखंडातील अनेक राज्ये सांपत्तिकदृष्ट्या भरभराटीला आलेली होती. त्यावेळच्या सम्राटांची प्रवती विस्तारवादी होती. या विस्तारवादाला धर्म व अध्यात्म याच सहकार्य नसलं तरी विरोधही नव्हता. राजसत्ता आणि धर्म यांची स्वतंत्र विश्वं होती. सहसा त्यांचा एकमेकांत हस्तक्षेप होत नसे.
 कालांतराने सनातन धर्माचे स्वरूप बदलत गेलं. त्यात अनेक दोष शिरले. जाती

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf
अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची / १५३