पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


हरकत आहे अशा भावनेनं पहली बाटली तोंडाला लावली जाते. तिची चव (केवळ नवी असते म्हणून) आवडते. माणसाला नावीन्याची आवड असतेच. नंतर काही दिवसांत जुनी पेयसंस्कृती या बाटलीत विरघळून जाते. पेप्सीच्या औद्योगिक ‘साम्राज्या'चा पाया मजबूत होतो. आपण ‘पेप्सीनिष्ठ' बनतो.
 वास्तविक शरीरप्रकृती, चव आणि किफायतशीरपणा यांचा विचार करता, आपली घरगुती पेयं अनेक पटींनी श्रेष्ठ आहेत. पण लक्षात कोण घेतो? 'घर की मुर्गी दाल बराबर'या न्यायानं नवं ते चांगलं वाटू लागतं. नव्या साम्राज्यवादाची सुरुवात होते.
 या उदाहरणांचा सारांश असा की, पाश्चात्य उद्योगांच्या आक्रमक व्यवस्थापनाचा पाया त्यांच्या चर्च आणि सैन्य संस्कृतीत आहे. (जाहिरातबाजी हा विक्री व्यवस्थापनाचा एक भाग आहे.) त्यामुळे नव्या नव्या देशात घुुसूून तिथं आपलं साम्राज्य उभं करणंं त्यांना शक्य होतं. या उलट स्थिती भारतीय व्यवस्थापनाची आहे. त्याचा पायाही असाच सांस्कृतिक व आध्यात्मिक आहे. पण विरुध्द अर्थानं साहजिकच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या झंझावातासमोर आपलं ‘टैलेंटेड' व्यवस्थापनही फिकं पडतं. इतकं की कालांतराने स्वतःचं स्वातंत्र्य आस्तित्त्व विसरून ते बहुराष्ट्रीय कंपन्यांचा एक भाग बनतं,किंवा त्यांना विकलं जातं. म्हणूनच पेप्सी किंवा कोलाइतकी, किंबहुना त्यापेक्षा चांंगली शीतपेयं बनविणारी 'पालें' कंपनी विकली गेली. थम्स अप,टॉप ऑरेंज इत्यादी ब्रँँण्ड काळाच्या पडद्याआड गेले.

 या वावटळीसमोर ‘शुध्द भारतीय' उद्योगांचा व व्यवस्थापनाचा पाडाव होणार की पाड लागणार हा कळीचा मुद्दा आहे. खाद्यपेयांबाबत आपण जुने संस्कार विसरलो पण,कार्यपध्दतीच्या दृष्टीनं मात्र आपण संस्कृती टिकवून आहोत. अशा स्थितात बहुराष्ट्रीय कंपन्यांसमोर टिकाव धरायचा असेल तर काय करावे लागणार आहे आणि कसंं याचा विचार पुढील लेखात करू.

व्यवस्थापकीय धर्मांंतर/१५२