पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१६०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


येत नाही हे राजांच्या लक्षात आलं होतं.त्यामुळे जिंकलेल्या प्रदेशात धर्मातर मिशनरी कार्य व चर्चसंस्था बलशाली करण्याला प्राधान्य दिलं. त्यामुळे पूर्वी अन्य संस्कृती मानणारे अनेक भूूप्रदेश खिश्चन बहजन झाले व रोमन राजांशी एकनिष्ठ राहू लागले.
 अशा तऱ्हेनं धर्मप्रसार व साम्राज्य विस्तार ही दोन्ही उद्दिष्टे धर्मसंस्था व राजसत्ता यांनी संघटीतरीत्या पूर्ण केली. रोमन साम्राज्य व खिश्चन धर्म यांचा प्रसार जगातील प्रत्येक खंडात झाला. धर्मप्रसारामुळं राजसत्ता मजबूत झाली. राजसत्तेच्या पाठिंब्यामुळं धर्मप्रसार वेगानं झाला. या यशामळे संघटित आक्रमण व शिस्तबध्दता हा पाश्चात्य संस्कृतीचा स्वभाव बनला.
 दोनशे वर्षांपूर्वी युरोपात झालेल्या व नंतर जगभरात पोचलेल्या औद्योगिक क्रांतीमध्ये याच स्वभावाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. आज युरोप किंवा अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्या 'तिसऱ्या जगा'त आपलं जाळं पसरविताना याच ऐतिहासिक चर्च आणि सैन्य संकृतीचा उपयोग करतात. फक्त फरक एवढाच की, साम्राज्य विस्ताराची जागा उद्योगाांंनी घेतली आहे. तर धर्मप्रसाराची जागा जाहिरात बाजीनं घेतली आहे.म्हणजे नेमकं काय, हेे एका उदाहरणावरून समजूून घेऊ. मागच्या पिढीतील लोकांची रोजची पेयं कोणती होती, तर कैरीचं पन्हं, त्या त्या त्या मोसमात मिळणाऱ्या फळांचा रस,दूध,लस्यी इत्यादी घरी तयार केली जाणारी पेयं. थोड्या फार प्रमाणात चहा व कॉफी या दोनच पाश्चिमात्य पदार्थांनी त्यांच्या 'पेयजीवनात’ शिरकाव केला होता.
 आजच्या पिढीची प्रमुख पेयं कोणती आहेत, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी तयार केलेली पेेप्सी, कोला, मिरांडा इत्यादी बाटलीबंद पेयं. परिस्थिती अशीच चालू राहिली तर पुढच्या पिढीतील ‘सुनां'ना पन्हं कसं तयार करतात हे माहीत नसलं तरी कुणाला आ२चर्य वाटणार नाही. अवघ्या एका पिढीत हा फरक कसा पडला असेल?

 इतिहास काळात नवीन प्रदेशांवर आपल्या राजसत्तेची पकड मजबूत करण्यासाठी तिथल्या प्रजेला तिची जुनी संस्कृती विसरायला लावली गेली. यासाठी धर्मांतराची मदत घेण्यात आली. धर्मातर झालेली व्यक्ती आपल्या मूळ धर्माला पारखी होते. साहजिकच नव्या धर्माशी अधिक एकनिष्ठ बनते. त्याच धर्तीवर आजच्या काळात जुन्या खाण्यापिण्याच्या सवयी विसरायला लावण्यासाठी पध्दतशीर जाहिरातबाजीचा उपयोग बहुराष्ट्रीय कंपन्या करतात. विशेष म्हणजे जाहिरातींसाठी स्थानिक लोकप्रिय व्यक्तींचा वापर केला जातो. (सचिन,गांगुली वगैरे) त्यामळे त्या भावनात्मकदृष्ट्या प्रभावी बनतात. टीव्ही, रेडिओ, वृतपत्र इत्यादी माध्यमांचा वापर करून त्या सतत लोकांच्या कानाडोळ्यांवर आदळवल्या जातात हळूहळू त्या भिनतात. सचिनही पेप्सी पितो मग आपण चव बघायला काय

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/१५१