पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उत्तम व्यवस्थापनाचं रहस्य


अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

र पुरातन काळची गोष्ट आहे. एक राजा होता. स्वभावानं अत्यंत विक्षिप्त. कोठेही गेला तरी आपल्या पायाला धूळ किंवा माती लागलेली त्याला खपायचं नाही. त्यामुळंं तो जिथं जाणार असेल तिथले रस्ते किंवा माती असणारी कोणतीही जागा त्याच्या सेवकांना घासून पुसून साफ करावी लागत असे. हे मोठे अवघड काम होतं. या स्वच्छतेच्या तडाख्यातून प्रजाजनही सुटत नसत. राजा तसा प्रजाहितदक्ष होता. कुणाच्याही घरात जाऊन त्याची विचारपूस करणंं आणि त्याच्या अडचणी सोडवणं त्याला आपलं कर्तव्य वाटत असे. त्यामुळे तो एखाद्या नागरिकाच्या घरात जाणार असं त्याच्या सेवक - शिपायांना समजलं की ते त्या व्यक्तीच्या घराचा स्वच्छतेसाठी ताबा घेत. त्यातील सामानसुमानाची कशीही हवालहलव करीत. घर अक्षरश: ‘धुऊन’ काढीत, जेणे करून राजेसाहेबांच्या पायाला धूळ लागू नये. याचा प्रजेला आत्यंतिक त्रास होई.राजा आपल्या घरी येणार हे समजलं की आनंद होण्याऐवजी त्यांंना संकट वाटे. राजाच्या सेवकांनाही ही रोजची कटकट असह्य होत असे. पण राजाज्ञेेसमोर कुणाची काय टाप चालणार ?

 अखेर या समस्येवर उपाय शोधण्यासाठी राजाच्या नकळत मंत्रिमंडळाची खलबतं सुरु झाली. पण कुणालाच काही जालीम उपाय सापडेना. शेवटी राजधानीबाहेर वनात वास करणाऱ्या एका ज्ञानी साधू महाराजांचा सल्ला घ्यावा असं सर्वानुमते ठरलंं. त्यानुसार साधू महाराजांची भेट घेऊन त्यांच्या कानावर समस्या घालण्यात आली. काही दिवसांनी साधू महाराज स्वतःच राजाला भेटायला आले. येताना त्यांनी राजासाठी भेट म्हणून दोन विचित्र भासणाऱ्या आणि एकमेकांसारख्या दिसणाऱ्या वस्तू आणल्या होत्या. त्या राजाला देऊन ते म्हणाले,'राजन, पायाला धूळ लागलेली आपल्याला सहन होत नाही हे मला कळलं. आपल्या या सवयीचा आपले सेवक व प्रजाजन यांना त्रास होतो हेही समजलं. म्हणूून मी या वस्तू आपल्यासाठी आणल्या आहेत. यांना खडावा म्हणतात. या आपण आपल्या पायात घातल्या की पावलांना धूळ लागणं निव्वळ अशक्य आहे. मी काही दिवस विचार करून माझ्या शिष्यांकरवी त्या खास आपल्यासाठी बनविल्या आहेत. धूळ लागू नये म्हणून रस्ते झाडण्यापेक्षा आपण स्वतःच्या पावलांना संरक्षण दिले की झालं. सर्वांचीच समस्या सुटेल. राजाला ही कल्पना फार आवडली. त्यानं खडावा वापरण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो स्वत:, त्याचे सेवक आणि प्रजाजन यांची अडचण एका तडाख्यात सुटली. (पादत्राणांचा

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ १४७