पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवस्थापकीय सल्लागार

 

स्थांमध्ये व्यवस्थापनाचं महत्त्व वाढू लागलं, तसं व्यवस्थापन - सल्लागार व्यवसायाला बाळसं येत गेलं. संस्थेचं भवितव्य केवळ तिची उत्पादनं किंवा सेवा यावर नव्हे, तर तिचं व्यवस्थापन कसं केलं जातं यावर अवलंबून आहे, याची जाणीव संस्था चालकांना झाल्याने व्यवस्थापन - सल्लागार व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे.

 विशेषत: आर्थिक उदारता व जागतिकीकरणाच्या धोरणामुळे विविध व्यवसायांमधील स्पर्धा वाढू लागली आहे. सरकारी उद्योगांनाही आता सरकारचं संरक्षण मिळत नाही. 'सुरक्षित बाजारपेठ' ही संकल्पना इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असून तिची जागा 'ग्राहकांची बाजारपेठ’ या भांडवलशाही संकल्पनेकडून घेतली जात आहे. अशा स्थितीत आपल्या संस्थेला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी संस्थाचालक केवळ संस्थेत काम करणाऱ्या व्यवस्थापकांवर अवलंबून न राहता, खासगी सल्लागारांचं साहाय्यही नित्यनेमाने घेऊ लागले आहेत.
काही मार्गदर्शक मुद्दे :
 साहजिकच मागणी तसा पुरवठा या न्यायाने खाजगी व्यवस्थापकीय सल्लागारांची संख्याही वाढू लागली आहे. नवे, जुने, अनुभवी, अननुभवी असे बरेच जण या व्यवसायात उडी घेऊ लागले आहेत. त्यामुळे येथेही गळेकापू स्पर्धा सुरू झाली आहे. तेव्हा या व्यवसायाचं भवितव्य काय आहे आणि तो करीत असताना कोणती पथ्यं पाळावी लागतात, याबद्दल इच्छुकांशी हितगुज करणं हा या लेखाचा उद्देश आहे. मी स्वतः एक मुरलेला व्यवस्थापकीय सल्लागार असल्यानं माझे मुद्दे मार्गदर्शक ठरतील अशी आशा आहे. हा व्यवसाय दोन प्रकारे करता येतो. एक व्यक्तिगत पध्दतीनं आणि दोन, संस्थात्मक पध्दतीनं. व्यक्तिगत पध्दतीनं म्हणजे, व्यवस्थापकीय सल्लागाराचं काम करणाऱ्या संस्थांमध्ये नोकरी करून किंवा अन्य कोणत्या मार्गानं त्या संस्थेचा एक भाग बनून हा व्यवसाय करता येतो.

 सुमारे वीस वर्षांपूर्वी व्यक्तिगत पातळीवर करण्यात येणारा व्यवसाय तेजीत

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची / १४३