पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


झाल्यानंतर त्यात प्रवेश घेण्यास विद्यार्थी तयार होणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांअभावी संस्था बंद करणं चालकांना भाग पडेल.
 मात्र हा उपाय करण्याअगोदर अशा संस्थांना सुधारण्याची संधी दिली जाणेही आवश्यक आहे. अशी सुधारणा घडवून आणण्यासाठी पुढील उपाय करता येतील.
 १.अशा संस्थांना ख्यातिप्राप्त संस्थांच्या संपर्कात आणणे किंवा शक्य झाल्यास त्यांच्याशी संलग्न करणे.
 २.अशा संस्थांमधील शिक्षकांना चांगलं प्रशिक्षण देऊन सक्षम बनविणे. त्यांच्यासाठी कार्यशाळा व कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्यांच्या कामगिरीवर सतत लक्ष ठेवणे.
 ३.संगणकाचा वापर अधिक प्रमाणात करून व्हिडीओ शिक्षणावर भर देणे शिक्षकांची संख्या कमी करणं.
 भविष्यकाळात शिक्षणात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार आहे. व्यवस्थापकीय शिक्षणही त्याला अपवाद नाही. संगणक वापरता आल्याखेरीज व्यवस्थापन ९ घेताच येणार नाही, अशी स्थिती आताच निर्माण झाली आहे. पुढील काळात ती अधिकच तीव्र होईल. त्यामुळे व्यवस्थापन शिक्षणाला जोडूनच संगणक अनिवार्य करणं संस्थांवर बंधनकारक केलं जाणं आवश्यक आहे.

 शेवटी सांगायचं तर व्यवस्थापन शिक्षणाच्या प्रसाराचा फायदा उठवायचा असेल तर त्याचा दर्जाही टिकवून धरण्याला पर्याय नाही. आपण डोंगर चढायला सुरुवात केली आहे मध्यापर्यंत पोहोचलो आहोत. तेथून खाली घसरायचं की निर्धाराने शिखर गाठायचं हे आपल्याच हातात आहे.

व्यवस्थापन शिक्षणाचे भवितव्य/१३०