पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मान्यता मिळविली.
 कोणत्याही इमारतीत चार संगणक आणून टाका, पाच पंचवीस पुस्तके कपाटात ठेवा, काही मासिके चालू करा आणि दोन चार प्राध्यापक नियुक्त करा, अनेक कसरती करून मान्यता मिळवा की झाली शिक्षण संस्था तयार, अशी अवस्था यामुळे निर्माण झाली आहे.
 अशा प्रकारे सध्या व्यवस्थापन शिक्षणाचा ‘ज्वालामुखी’ धगधगत आहे. सध्या देशात १ हजाराच्या आसपास संस्था ५० हजारांहून पदवी - पदविकाधारकांना दरवर्षी । नोकऱ्यांच्या बाजारात आणून उभे करीत आहेत. भारतात दरवर्षी जेवढे ‘व्यवस्थापक तयार होतात, तितके बाकीच्या पूर्ण जगात होत नाहीत!
 संख्या प्रमाणाबाहेर वाढली की, गुणवत्ता कमी होते हा निसर्गाचा नियम आहे व्यवस्थापन शिक्षणाबाबत हेच घडत आहे.
'उद्याचे' व्यवस्थापन शिक्षण :
 परमेश्वरा, जे मी करू शकतो, ते करण्याचे सामर्थ्य मला दे. जे मी करू शकत नाही ते सहन करण्याची शक्ती दे आणि चांगल्या वाईटातील फरक ओळखण्याचे शहाणपण मला दे’ अशी प्रार्थना आहे व्यवस्थापनशास्त्राचं गुपितच जणू या प्रार्थनेत दडलं आहे. त्यामुळे या शास्त्राचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आपली क्षमता व बऱ्यावाईटांतील फरक ओळखण्याची कुवत यांचा वापर करूनच कोणत्या ठिकाणी शिक्षण घ्यावयाचे याचा विचार करावा लागणार आहे.
 वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयांची चलती होती, तेव्हा चांगल्या संस्था सुमार संस्था असा एक अंतर्गत संघर्ष त्या शिक्षण क्षेत्रात निर्माण झाला होता. तसाच आता व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात उभा राहिला आहे. हे एक प्रकारे ध्रुवीकरण आहे. चांगल्या संस्थांमध्ये विद्यार्यांना चांगले शिक्षक, चांगली साधने व सुविधा याद्वारे कसदार शिक्षण दिले जात आहे तर बाकीच्या संस्थांमधून केवळ पदव्या दिल्या जात आहेत.
 ही दरी बुजविण्यासाठी व्यवस्थापन व्यावसायिकांची एक दक्षता समिती नेमणं आवश्यक आहे. विविध मान्यताप्राप्त संस्थांमध्ये दिल्या जाणाच्या शिक्षणाच्या दर्जावर लक्ष ठेवण्याचा अधिकार या संस्थेला दिला जावा. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात ऑल इंडिया मेडिकल कौन्सिल या संस्थेकडून शिक्षणाच्या दर्जावर लक्ष देण्याचे काम केलं जातं. संस्थेला काही कायदेशीर अधिकारही आहेत.

 ज्या संस्थांना अधिकृत मान्यता नाही, त्यांची नावे अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण समितीने वेळोवेळी जाहीर करावीत एखादी संस्था मान्यताप्राप्त नाही, हे एकदा हे एकदा जाहीर

अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/१२९