पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१३५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

विद्यार्थ्यांचा भाव इतका वधारला की, नोकरीसाठी त्यांना अर्ज द्यावा न लागता संस्थाच त्यांच्याकडे येऊ लागल्या. कॅम्पस इंटरव्ह्यू या संकल्पनेची सुरुवात येथूनच झाली. या घवघवीत यशामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची लोकप्रियता वाढली. एमबीए पदवीधरांची वाढती गरज लक्षात घेऊन बंंगळूर, लखनौ आदी शहरांमध्येही त्या संस्था उभ्या राहिल्या.
 अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण संस्थेने विद्यापीठाच्या बाहेर खासगी संस्थांनाही एमबीएचा अभ्यासक्रम सुरू करण्याची अनुमती देण्याचा सपाटा सुरू केला. त्यामुळे अशा संस्थांचे रान माजण्यास मदत झाली. पर्यायाने व्यवस्थापन शिक्षणाच्या दर्जात चिंताजनक घट झाली आहे. भरमसाट शुल्क आकारूनही विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा व सकस शिक्षण न देणाऱ्या 'प्रॉफिट ओरिएंटेड' संस्थाही असंख्य आहेत. एमबीए असणं ही सामाजिक प्रतिष्ठेची बाब असल्याने विद्यार्थीही मागचा पुढचा विचार न करता स्वतःची फसवणूक करून घेत आहेत.

 या दर्जाहीनतेला कोणकोणते घटक जबाबदार आहेत व त्यांना दूर सारून दर्जा सुधारण्यासाठी काय करावे लागेल तसंच व्यवस्थापन शिक्षणाचं उद्याचं स्वरूप कसं असणार आहे याबाबत अनेक तज्ज्ञ सांगोपांग विचार करीत आहेत. माझीही यासंबंधी निश्चित अशी मतं आहेत. त्याबद्दल पुढील लेखात.

व्यवस्थापन शिक्षण: काल, आज व उद्या/१२६