पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


 इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग क्षेत्रात काही काळ काम केल्यानंतर मी आयसीआयमधील ऑर्गनायझेशन अँण्ड मेथड्स या विभागात काम केले व युनियन कार्बाईडमधील पहिला भारतीय संगणक व्यवस्थापक बनलो. त्यानंतर मला एका औषध कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मिनू मसानी त्या कंपनीचे सल्लागार होते. मी त्यांना म्हणाले, "मी पहिला जॉब स्वीकारलाय खरा, पण मला औषधे तयार करण्याचा सोडाच पण घेण्याचाही फारसा अनभव नाही. मला हे काम जमणार याबाबत मीच साशंक आहे. मी हा अनाठाई धोका तर पत्करत नाही ना?" यावर मसानी म्हणाले, "अरे, ज्यांनी तुला हे काम दिले त्यांनी तुझ्यापेक्षाही जास्त धाेेका पत्करला आहे असं तुला वाटत नाही का?”
 माझ्यां सर्व शंका क्षणात दूर झाल्या.
 यानंतर मी व्हिडिओ कॅसेट निर्मिती क्षेत्रात एक छोटा प्रायोजक या नात्याने प्रवेश केला. तसंच व्यवस्थापन विकास कार्यक्रमांमध्येही लक्ष घातलं.
 अशा प्रकारे मी डॉ. काणे यांच्या सल्ल्यानुसार ठराविक कालावधीनंतर कामे बदलत राहिलो. त्यामुळे माझंं अनुभवविश्व समृध्द होत गेलं.
 डॉ. काणे यांचा सल्ला मलाच नव्हे तर व्यवस्थापकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनाच मोलाचा आहे. व्यवस्थापकाला विविध क्षेत्रांतील अनुभव जितका जास्त तितकी त्याची कामगिरी सरस होते.त्याला कधीही एकांगी विचार करून चालत नाही.त्याची वृत्ती सतत नवीन शिकण्याची असली पाहिजे हेच डॉ. काणे यांच्या सल्लार्च सार आहे.

 पुढील लेखात माझ्या व्यवस्थापकीय कालखंडातील काही घडामोडी आपल्यासमोर मांडणार आहे.

हितगूज (भाग पहिला)/११८