पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यामुळे इतरांनाही कामचुकारपणाचे व्यसन लागावं यासाठी ते प्रयत्न करतात.असं केल्यास आपण ‘एकटे' पडणार नाही अशी त्यांची भावना असते. ‘प्रवासी'पणा हा देखील संसर्गजन्य रोग आहे. अशा कर्मचाऱ्यांंची संख्या ५० टक्क्यांंपर्यंत पोहोचल्यास संस्था कोसळते.
कामसू व प्रवासी कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन :
 कामसू कर्मचाऱ्यांचंं व्यवस्थापन करणंं सोपं असतं. त्यांना फारसं काही लागत नाही. ते स्वतःच पुढाकार घेऊन आपले काम करीत असतात.
 प्रवासी कर्मचाऱ्यांंना हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना एकटंं पाडणं व इतरांच्या संपर्कात फारसं येऊ न देणे. त्यांना काढणंं शक्य नसल्यास किमान त्यांचा इतरांना त्रास होणार नाही किंवा इतरांच्या कामात त्यांचा विनाकारण हस्तक्षेप होणार नाही अशा प्रकारची कामंं त्यांना देणंं शक्य असतं. ज्या ठिकाणी कामगार संघटना बळकट आहेत (उदाहरणार्थ, सरकारी कार्यालये, बँका, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग) तेथे अशा कर्मचाऱ्यांंना सरळ घरी बसवणंं अशक्य असतं. प्रवासी कर्मचाऱ्याने त्याच्याकडून केली जाणारी किमान अपेक्षा तरी पूर्ण करावी व दुसऱ्याच्या कामात कारण नसताना ढवळाढवळ करू नये. मग त्याला हात लावला जाणार नाही अशी अॅॅडजेस्टमेंट कित्येक ठिकाणी बॉस व असा कर्मचारी यांच्यात होते. ज्या ठिकाणी बॉस स्वत: कामसू असतो तेथे अशी जुळणी यशस्वी होते.
 कामसू व प्रवासी हे दोन्ही कर्मचारी वर्गाचे व्यवस्थापन सुयोग्य पध्दतीने करणंं यात व्यवस्थापकाच्या कौशल्याची कसोटी लागते. या दोन्ही वर्गांचा प्रभाव मधल्या सर्वसामान्य कर्मचारी वर्गावर पडत असतो. व्यवस्थापन सुदृढ असेल तर कामसू वर्गाचा प्रभाव अधिक पडेल. ते ढिले असेल तर प्रवासी वर्गाची सरशी होईल आणि संस्थेची हानी होईल.
चालकांचे सहकार्य आवश्यक
 कामसू कर्मचाऱ्यांची संख्या वाढ देण्यात व्यवस्थापनाचं खरं कौशल्य आहे. मधल्या वर्गातील अधिकांश कर्मचाऱ्यांंना कामसू बनविणं हे कामगार व्यवस्थापनासमोरचं आव्हान असतं. या कामी संस्था चालकांचंं मनापासून सहकार्य असणंं गरजेचं आहे. कर्मचाऱ्याची त्यांच्या कामगिरीवरून पारख करण्याचे स्वातंत्र्य संस्था चालकांनी व्यवस्थापनास देणंं आवश्यक आहे. यासाठी व्यवस्थापन व चालक यांच्यात परस्पर विश्वास व सततचा संंपर्क असणंं महत्वाचंं आहे.

 या सहकार्यात सर्वात महत्त्वाचा अडसर नातेवाईकबाजीचा असतो. अमुक कर्मचारी केवळ चालकाचा नातेवाईक आहे किंवा त्याचा संबंधित आहे म्हणून त्याला सांभाळून

कर्मचारी: कामसू व ‘प्रवासी’ / ११४