पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१२१

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कर्मचारी : कामसू व 'प्रवासी’

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

मच्या कंपनीच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या भांडवलाचा उल्लेख आमच्या बॅलन्सशीटमध्ये आलेलाच नाही. ते म्हणजे आमचे कर्मचारी’ हे हमखास टाळीचे वाक्य वार्षिक सर्वसाधारण सभेत भाषण करताना बहुतेक सर्व कंपन्यांंच्या अध्यक्षाकडून वापरले जाते.

 ही बाब खरी असते,पण वस्तुस्थिती अशीही आहे की,कर्मचारी जसे संस्थेची संपत्ती असतात, तसेच ते संस्थेची सर्वात मोठी अडचणही ठरू शकतात.
 सर्वसाधारणपणे असं दिसून आले आहे की, कोणत्याही संस्थेतील १० टक्के कर्मचारी कामसू असतात,तर २५ टक्के कर्मचारी निव्वळ ‘प्रवासी’ असतात.
 कामसू कर्मचारी कंपनीचे खरी संपत्ती असते. त्यांच्या कामावर देखरेख ठेवावी लागत नाही. सोपविलेली जबाबदारी ते अपेक्षेपेक्षाही अधिक चांगल्या पध्दतीने पार पाडतात. त्यासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त परिश्रम घेण्याची त्यांची तयारी असतेे. कामासाठी कराव्या लागणाच्या कष्टाची तुलना पगाराशी करण्याकडे त्यांचा कल नसतो.
 याउलट ‘प्रवासी’ कर्मचारी कधीही स्वतःचे ओझे उचलत नाहीत. त्यांना नेहमी कुणी तरी ओढत न्यावंं लागतं. कामसू कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आपला भार टाकून ते निर्धास्त असतात. असे कर्मचारी संस्थेची मोठी अडचण असते.
 ही दोन टोके सोडून उरलेले कर्मचारी सर्वसामान्य प्रकारचे असतात. त्यांची ठराविक कामं ते व्यवस्थित करतात. कारणपरत्वे विशेष जबाबदारी सोपविल्यास ते त्या कामात अपयशी ठरण्याची शक्यता असते. किंवा असं काम करण्यात ते पडतात. कर्मचाऱ्यांचे हे प्रकार व प्रमाण जवळपास सर्व संस्थांमध्ये सर्व स्तरांवर असंंच असते.
कामसू कर्मचारी :

 कठीण परिस्थितीत संस्था टिकवून धरणं व अनुकूल परिस्थितीत तिची वाढ आणि विकास करण्याचा वसा जणू या कर्मचाऱ्यांंनी उचललेला असतो. ‘काम'हेच

कर्मचारी: कामसू व 'प्रवासी'/ ११२