पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/११७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वेच्छाानिवृती : घर घर की कहानी

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf

हो, काही महिन्यांपूर्वी आमचे सगळे ठीकठाक चाललं होतं. सुखी, उच्च मध्यमवर्गीय जीवन जगत होतो आम्ही. माझ्या मिस्ट्रांना या संस्थेत तंत्रज्ञ म्हणून २५ वर्षांपूर्वी जॉब मिळाला आणि गेल्या वर्षी ते ज्युनियर मॅनेजर पदापर्यंत पोहोचले. पगारहीी १४ हजार रुपये झाला. माझे सासरे १० वर्षांपूर्वी रिटायर झाले.त्यांना १५०० रुपये पेन्शन होती. शिवाय ते छोटीमोठी कामे करून आणखी महिना दोन-तीन हजार रुपये मिळवत होतेच. मी स्वतः एका खासगी खाळेत १० वर्षे काम करीत आहे, आणि मला ३ हजार रुपये पगार आहे.एकंदर महिन्याकाठी आमच उत्पन्न १८-२० हजार पर्यंत जायचं आणि आम्ही आनंदात होतो.

 ‘‘पण आता हे व्हीआरएसचंं फंड निघालंय ना, त्यानं सगळे गणितच बदलून गेलंय. सहा महिन्यांपूर्वी यांना व्हीआरएस घेणे भाग पडलं आणि आमचं उत्पन्न २० हजारांवरून एकदम १०-१२ हजारांपर्यंत खाली आलंय. आमचा राजू गेल्या वर्षी ग्रँँज्युएट झांलाय, पण नोकरी मिळत नाहीये.खूपच ओढाताण होतेय आमची अलीकडे"
 ‘व्हीआरएस' किंवा स्वेच्छानिवृत्ती योजनेचा बळी ठरलेल्या कुटुंबातील वयाची आई आपल्या व्यथा कॉलनीतल्या शेजारीला सांगत होती. स्वेच्छानिवृतीचा पध्दत मोठ्या प्रमाणात अंमलात आल्यापासून या दुखण्याने अनेक घरांत प्रवेश केला आहे. ही योजना नव्या युगाचे एक अविभाज्य अंग बनंती आहे.ही ‘घर घर की कहानी'असल्याने तिचा वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून विचार होणं आणि ही योजना, समस्या न बनता एक संधी कशी बनेल याचा ऊहापोह होणे आवश्यक आहे. तसेच व्हीआरएस टाळण्यासाठी काही उपाय आहे का व तो कसा करावयाचा याबाबतही जाणून घेणे क्रमप्राप्त आहे.

 व्हीआरएस (व्हॉलैटरी रिटायरमेंट स्कीम) किंवा स्वेच्छानिवृत्ती या संकल्पनेत स्वेवेच्छा म्हणजे स्वत:ची इच्छा हा शब्द असला तरी तो नावापुरताच आहे. प्रत्यक्षात या ‘स्वेच्छे’ची सक्तीच केली जाते आणि तिला कायद्याची जोड असल्याने ती.कर्मचाच्याला स्वीकारावीच लागते.

स्वेच्छाानिवृत्ती: घर घर की कहानी/ १०८