पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/११२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राहून ‘धंदा’ सुखनैव सुरू राहतो. तेरी भी चूप मेरी भी चूप! अशा व्यवस्थापकांची ‘खाने खिलानेवाला आदमी’ अशी प्रतिमा बनते.स्वतःच्या अधिकाराचा वापर करून आपल्या मुलाबाळांना किंवा अन्य नातेवाईकांना नोकऱ्या किंवा कंपनीची कंत्राटं मिळवून देणं हा भ्रष्टाचाराचा आणखी एक लोकप्रिय मार्ग आहे. मात्र स्वतःच्याच कंपनीत आपल्या सग्यार्सोयऱ्यांना नोकऱ्या न देता दुसऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकांशी संधान बांधून त्याचे नातेवाईक आपल्या कंपनीत घेणं व स्वतःचे नातेवाईक त्याच्या कंपनीत घुसवणं असा उपाय केला जातो. या उपायामळे फारसा बभ्रा न होता काम होऊन जातं.
 आपली `कमाई’ इतरांच्या विशेषत: आपल्या सऱ्हकाऱ्यांच्या नजरेस येऊ नये यासाठी आणखीही काही खबरदारी घेतली जाते.
१. पार्टीच्या ठिकाणी आपल्या पत्नीचा पोशाख व दागिने आपल्या बरोबरीच्या इतरांच्या पत्नींसारखेच असावेत, याची खबरदारी घेणं.
२. आपल्या घरातील कार, टी.व्ही., एअरकंडिशनर इत्यादी चैनीच्या वस्तू बॉस किंवा आपले सहकारी यांच्या घरांतील अशाच वस्तूंपेक्षा महाग असणार नाहीत याच खबरदारी घेणे आणि महाग वस्तू असेलच तर ती सासऱ्याकडून भेटीदाखल आलेली आहे अशी जाहिरात करणं.
३. महागडे मद्य किंवा खाद्य आपण घेत नाहीत असं दाखविणं. असे व्यवस्थापक पीटर स्कॉचच्या बाटलीत स्कॉच व्हिस्की घालून ती पिताना अथवा सर्व्ह करताना मी पाहिले आहेत.पार्टीला हजर असणाच्या बऱ्याच जणांच्या लक्षात हा फरक येतही नाही. ४.आपल्या कुटुंबाला किंवा पाहुण्यांना महागड्या हॉटेलात घेऊन न जाणं, किंवा घेऊन गेले तरी आपल्या एखाद्या नातेवाईकाला अगोदर पैसे देऊन ठेवून त्याला बिल देण्यास सांगणं.
५.आपण काम करतो त्या गावात अलिशान घर न बांधणं. बहुतेक व्यवस्थापक कामाच्या जागी एखाद्या फ्लॅटमध्ये राहणं पसंत करतात, तर बंगला आपले सहकारी सहसा बघू शकणार नाहीत अशा गावी बांधतात.
६.आपली सासुरवाडी श्रीमंत असून त्यांच्याकडून आपल्याला किमती वस्तू भेट मिळतात,असा प्रचार करणं.
७. मौजमजा करायची असल्यास काम करत असलेल्या गावात न करणं. त्यासाठी दूरवरचा हॉलिडे रिसॉर्ट किंवा पर्यटन स्थळ शोधणं.
 अशा अनेक प्रकारच्या युक्त्याप्रयुक्त्या करून व्यवस्थापक आपली संपत्ती इतरांपासून विशेषतः सहकाऱ्यांपासून लपविण्याचा प्रयत्न करतात.

 पुढील लेखात व्यवस्थापकीय पातळीवर चालणऱ्या भ्रष्टाचाराचा सामना करण्याच्या उपायांबाबत माहिती घेऊ.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/१०३