पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१११

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


करून घेणं योग्य ठरेल.
 संस्था देते त्या पगारावर ज्याचं समाधान होत नाही व ज्याला अवैध मागनेि संपत्ती मिळविण्याचा मोह आहे. अशा व्यवस्थापकाला एका बाजूला भ्रष्टाचारातून मिळणारा फायदा घेणं तर दुसऱ्या बाजूला त्याची वाच्यता होऊ न देणं व आपण पकडले न जाणं अशी तारेवरची कसरत करावी लागते. ही कसरत जो व्यवस्थित सांभाळतो तो भ्रष्ट राहूनही प्रतिष्ठित म्हणवून घेण्यात यशस्वी होतो. भ्रष्टाचार करण्यात यशस्वी ठरलेल्या व्यवस्थापकांचा अभ्यास केला असता असं दिसून आलं आहे की, असे व्यवस्थापक पुढील ‘तीन कलमी’ योजनेचा अवलंब करतात.
 १. भ्रष्टाचाराचा बोलबाला होऊ न देणं.
 २. भ्रष्टाचारातून मिळणारा फायदा वाटून घेणं.
 ३. गुप्तपणे अधिक फायदा घेण्याचा मोह टाळणं.
 अनेकदा लहान प्रमाणात झालेल्या भ्रष्टाचाराची चर्चा जास्त होते,तर मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचार कुणाच्या गावीही नसतो. हुशार व्यवस्थापक अशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात की, त्याचा बोलबाला कमीत कमी व्हावा. किंवा झालाच तर त्यात त्याचं नाव गोवलं जाऊ नये.
 थेट पैसा स्वीकारणं, अप्रत्यक्षपणे पैसा स्वीकारणं, आपल्या सग्यासोयऱ्यांंना नोकरी मिळवून देणं व लैंगिक सुख मिळविणं या भ्रष्टाचारातून चार प्रकारे मिळणाऱ्या फायद्यांपैकी लैगिक भ्रष्टाचाराची चर्चा सर्वाधिक होते. यामागचे कारण नैतिकतेची बूज हे नसून मत्सर हे असतं. यासाठी संस्थेतल्याच महिलांचा वापर केल्यास चर्चा अधिक प्रमाणात होते. म्हणून मध्यस्थांकरवी ही हौस भागविण्याची व्यवस्था करण्याचा कमी धोकादायक मार्ग व्यवस्थापक वापरताना दिसून येतात.
 पैशाच्या भ्रष्टाचाराचा सर्वमान्य मार्ग म्हणजे कंपनीसाठी मालाची खरेदी करताना कमिशन घेणं. यात जे छोटे पुरवठादार असतात त्यांना अधिक कमिशन देणं जमत नाही. त्यामुळे ते जास्त आरडाओरड करण्याची शक्यता असते. म्हणूनच हुशार व्यवस्थापक त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवत नाहीत. पुरवठादारांकडून ती कसर भरून काढली जाते.याबाबत पॅरेटोचा ८०:२० हा नियम प्रसिध्द आहे.त्यानुसार ८० टक्के कमिशन बड्या पुरवठादारांकडून तर २० टक्के कमिशन छोट्या पुरवठादारांकडून घेतले जातं.याचा दुहेरी फायदा होतो. मिळायचा तितका पैसा मिळतोच.शिवाय छोट्या पुरवठादारांमध्ये त्याची प्रामाणिक म्हणून ख्याती होते. या गुडविलचा उपयोग पदोन्नती मिळविण्यासाठी होतो.

 भ्रष्ट मार्गांनी मिळणाऱ्या फायद्यात बॉस पासून कनिष्ठापासून सर्वांना सामावून घेणं हा सुरक्षित मार्ग अनेक व्यवस्थापक अंमलात आणतात. त्यामुळे सर्वांचीच तोंडं बंद

भ्रष्टाचाराचा शिष्टाचार व संस्था/१०२