पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१०९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भ्रष्टाचाराचा शिष्टाचार व संस्था

ष्टाचार ही प्रमुखत: `देणारा’ व ‘घेणारा' अशा दोन व्यक्तींमध्ये चालणारी एक

अनैतिक प्रक्रिया आहे. मात्र त्यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर ती सामूहिक बनते. त्यानंतर भ्रष्टाचाराला सामाजिक अधिष्ठान प्राप्त होतं. तो अंगवळणी पडतो. त्याला विरोध करण्याऐवजी त्यापासून आपला फायदा कसा होईल या दृष्टीने विचार करण्याची प्रवृत्ती माणसात तयार होते. भ्रष्टाचाराच्या मागनि संपत्ती मिळविण्यात काही वावगं आहे असं वाटेनासं होतं. उलट न पकडला जातो तो जास्तीत जास्त भ्रष्टाचार करू शकतो, तो जास्त बुध्दिमान अशी समाजाचीही भावना निर्माण होते. थोडक्यात, भ्रष्टाचाराचा शिष्टाचार बनतो. मात्र कालांतराने त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतात.
{[gap}}दोन दशकांपूर्वी राजकारण्यांचे समाजातील भ्रष्टाचारी व्यक्तींशी संबंध असल्याचे आरोप होत होते. मात्र आता प्रत्यक्ष गुन्हेगारच राजकारणात उतरत आहेत. ते भ्रष्टाचारी आहेत हे माहीत असूनही जनता त्यांना निवडून देत आहे. भ्रष्टाचाराचा शिष्टाचार झाल्याचाच हा सज्जड पुरावा आहे. भ्रष्टाचार करणं अनैतिक व कायदेशीरदृष्ट्या पापकृत्य आहे याची जाणीव भ्रष्टाचाऱ्याला नसते असं नाही. तरीही तो भ्रष्टाचाराला उद्युक्त का होतो, याचं उत्तर आधुनिक समाजव्यवस्थेत आहे. सध्याच्या युगात पैशाला सर्वाधिक महत्त्व आहे. सर्व सोंग आणता येतील, पण पैशाचं सोंग आणता येत नाही असे म्हणतात.पैसा नसणे किंवा अपुरा असणं ही सर्वात मोठी कमतरता आहे अशी सार्वत्रिक भावना आहे. ‘सर्वे गुणाः कांचनम् आश्रयंते’ अर्थात सर्व गुण अखेर पैशाला शरण जातात, ही म्हण जूनी असली तरी सध्याच्या काळात ती कधी नव्हे इतकी ‘अर्थपूर्ण' बनली आहे. माणसाची प्रतिष्ठा व सुरक्षा त्याच्याकडे असणाच्या पैशाच्या प्रमाणावर अवलंबून आहे, याचा साक्षात्कार पदोपदी होत आहे.त्यामुळे मिळेल त्या मार्गाने शक्य तितका पैसा कमावणे, त्यासाठी आपल्या अधिकारांचा व स्थानाचा गैरवापर करण्यास मागेपुढे न पाहणं हा जणू युगधर्म बनला आहे.
 भ्रष्टाचाराचा शिष्टाचार होण्याच्या अनेक पायऱ्या आहेत. भ्रष्टाचाराचे शास्त्र समजून घेण्यासाठी त्यांची माहिती असणं आवश्यक आहे.

१. व्यक्तिगत भ्रष्टाचार : आपल्याला रजा हवी आहे, पण मिळविण्यासाठी सबळ कारण नाही. अशा वेळी एखाद्या डॉक्टरकडून आजारी असल्याचं प्रमाणपत्र त्याची 'फी'

भ्रष्टाचाराचा शिष्टाचार व संस्था /१००