पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१०४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्योग कटकट नको म्हणून विकून टाकण्याकडे सरकारचा कल आहे. वीजनिर्मिती, विमानसेवा, पोलाद, बँका, विमा कंपन्या यांचेही खासगीकरण अटळ आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येला कात्री लागणार हे उघड आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचारी खासगी रोजगार मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे शक्य नसलेल्यांना त्यांच्या भवितव्याची चिंता भेडसावते आहे. एकंदर या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास खालावल्याचे दिसून येत आहे. स्वेच्छानिवृती योजनेमुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या हातात एकदम मोठी रक्कम आली. मात्र त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केल्याचे दिसून येत नाही. ते दुसरीकडे काम मिळविण्याच्या प्रयत्नांत आहेत, तर काही जणांनी सल्लागाराचा व्यवसाय सुरू केला आहे, पण सल्लागाराकडे 'क्लायंट' नसतील, तर त्याची अवस्था कार्यकर्त्यांंविना नेता अशी होते. तसाही अनुभव अनेकांना आलेला आहे.
उद्याचे भवितव्य :
 सार्वजनिक क्षेत्राचं अर्थव्यवस्थेतील महत्त्व घसरणीला लागलं आहे हे निःसंशय. घड्याळाचे काटे कुणालाही मागे फिरविता येणार नाहीत. त्याचा उपयोगही होणार नाही.सध्या या उद्योगांमधील कर्मचाऱ्यांना दोन शक्यतांची भीती वाटते. एक, एखादी खाजगी कंपनी हा उद्योग विकत घेईल आणि सर्व कर्मचाच्यांची छुट्टी करेल. दोन, खासगी कंपनी उच्च पदांवर नवी माणसं आणून बसवेल आणि आपण इतकी वर्षे सेवा फरूनही मंडळीचे कनिष्ठ म्हणून काम करावे लागेल. याखेरीज कंपनीची कर्मचाऱ्याकडून जास्त कामाची अपेक्षा असते. त्यामळे इतके दिवस आरामात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेणे अवघड वाटत आहे.
 अशा स्थितीत मनोवृत्तीत बदल घडवून आणणं ही गरज आहे. पूर्वीप्रमाणे एकाच कंपनीत ३०-३५ वर्षे काम करून लठ्ठ पेन्शन मिळवून निवृत्त होण्याचे दिवस आता संपले. कर्मचाऱ्यांचा बोजा कायमचा नको म्हणून,अनेक कंपन्या कंत्राटी पध्दतीचा अवलंब करीत आहेत. असे पहिल्यांदाच होत आहे असं मात्र नाही. बांधकाम व्यवसाय,चित्रपट व्यवसाय हे धंदे प्रथमपासूनच कंत्राटी पध्दतीवर चालतात,पण या धंंद्यात बेकारी असे दिसून येत नाही.

 शेवटी मी तर म्हणेन की, बदलत्या काळाने सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची एकाच कंपनीतील सुरक्षा काढून घेतली असली तरी त्यांच्या कौशल्यासाठी जग मोकळं करून दिले आहे. ‘जॉब सिक्युरिटी’ नसली तरी व्यावसायिक कौशल्याला सतत मागणी राहील अशी संधीही उपलब्ध करून दिली आहे. हे कौशल्य फुलविल्यास नव्या जमान्याचा सामना करणं केवळ शक्य नव्हे तर अधिक लाभदायक ठरू शकेल.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची /९५