पान:अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण केली तर अत्यंत कठीण अवस्थेतही तो मनापासून काम करण्यास सक्षम बनतो. प्रबोधनातून अशी भावना निर्माण करणे शक्य होतं. हे प्रबोधन पुढील प्रकारे करता येईल.
 १.कर्मचार्यांकरीता चर्चासत्रं आयोजित करणंं.
 २.अडचणींंच्या वेळी व प्रतिकूल वातावरणात काम करूनही कर्मचाऱ्यांची प्रकृती चांगली कशी राहील याबाबत मार्गदर्शन करणंं.
 ३.वरिष्ठ व्यवस्थापकाने स्वत: दिवसातून थोडा वेळ तरी कर्मचार्यांबरोबर त्याच परिस्थितीत काम करणंं हा एक महत्वाचा उपाय आहे.वरिष्ठ वातानुकुलित खोलीत आरामशीर बसून केवळ हुकूम सोडण्याचंं काम करत असतील तर कर्मचार्याच्या मनात त्यांच्याबद्दल अढी निर्माण होते.मग कर्मचारी शक्य होईल तेव्हा हा राग कामावर काढतो. परिणामी त्याची कामगिरी खालावते.
 ४.प्रतिकूल परिस्थितीत काम करणार्या कर्मचार्यांच्या अडचणींचा, सहानुभूतीपूर्वक विचार करणे. केवळ नियमांवर व कर्मचार्यांकडून कबूल करून घेतलेल्या ‘सहिंस कंडिशन'वर बोट ठेवून त्याला राबवून घेण्याऐवजी कल्पकता दाखवून त्याच्या अडचणी सुसह्य होतील असे उपाय व्यवस्थापनाने योजल्यास कर्मचाऱ्याचा आत्मविश्वास दुणावतो. वरिष्ठ अधिकार्यांनी रजा नाकारली म्हणून कनिष्ठ पोलिसांकडून आत्महत्या करण्याचे प्रकार काही वेळ घडतात.त्यात कर्मचार्याचा आततायीपणा असला तरी त्याच्या अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार न करण्याची वरिष्ठांची मनोवृत्तीही अशा प्रकारांना तितकीच कारणीभूत असते.

 तात्पर्य,कामाचे तर्कशास्त्र कर्मचार्याचंं तर्कशास्त्र यांच्यात व परस्पर सहयोग जितका चांगला तितकी कर्मचार्याची व पर्यायाने संस्थेची कामगिरी सरस होते. हे लक्षात घेऊन व्यवस्थापकाने साधक असे उपाय योजले पाहिजेत.

अदभुत दुनियाचा व्यवस्थापनाची/९१