Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्यक्तिकेंद्रित राजकारण, एकमेकांचे पाय ओढण्याची वृत्ती, संस्थेच्या हितापेक्षा व्यक्तीचे हित महत्त्वाचे मानणं आदी प्रकार आपल्या औद्योगिक व इतर संस्थांमध्ये सहज घडत असतात, त्यात काही चुकीचं आहे असं वाटतही नाही. हे सर्व समाजरचनेच्या प्रभावामुळेच होत आहे. त्यामुळे बुध्दिमत्ता, कर्तृत्त्व आदी व्यवस्थापकीय गुण वाया जात आहेत. | अशा परिस्थितीत समाज रचनेचा परिणाम उद्योगांवर होऊ न देणं हे व्यवस्थापकांसमोरच खडतर आव्हान आहे. संपूर्ण समाज बदलणं व्यवस्थापकाच्या हातात नसत. " समाजसुधारक असेलच असं नाही. तशी अपेक्षाही त्याच्याकडून केली जाऊ शक नाही. शिवाय तो स्वतःच या समाजरचनेचा बळी असण्याची शक्यता अधिक असे अशा वेळी परिवर्तनाची सुरुवात त्याला स्वतःपासून करावी लागते आणि हेच का? कठीण असतं. मात्र ते केल्याशिवाय आधुनिक काळात भारतीय उद्योगांचा पाडा लागणं कठीण आहे. | त्यामुळे समाजरचनेचा विपरीत परिणाम उद्योगांवर होऊ नये, म्हणून काय कर येईल याबाबत व्यवस्थापनाने गंभीरपणे विचार केला पाहिजे. कित्येक संस्थांमध्ये प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर सुरू झाली असून त्याला यशही येत आहे. भारतीय उद्या गरुडाचे पंख आणि चोच मिळवून देण्यासाठी आधुनिक व्यवस्थापन काय उपाययो" करीत आहे याचा विचार पुढच्या स्वतंत्र लेखात करू. समाजरचनेचा विपरित परिणाम / ८२