Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| महाकवी तुलसीदासाने म्हटलं आहे, ‘कोहू को राजा, हमै का हानी' (राजा कोणीही असो, आम्हाला काय त्याचे) ही अवस्था शतकानुशतके कोणताही बदल न होता चालत राहिली. समाजव्यवस्था कासवाप्रमाणे दीर्घायुषी पण निष्क्रिय बनली. याच सुमारास पाश्चिमात्य देश कासवाचे गरुड बनले होते. | गेली सुमारे दीड हजार वर्षे आपण स्वीकारलेल्या या कासव परंपरेमुळे समाजाची काही अंगभूत वैशिष्ट्ये बनली आहेत. ती जुन्या काळात कदाचित सोयीची असतील, पण सध्याच्या उद्योगप्रधान व अर्थप्रधान काळात जाचक नव्हे तर घातक ठरत आहेत. हे दोष पुढीलप्रमाणे - १. कामांची जातीनिहाय विभागणी व एका जातीचे काम दुस-या जातीने करायचं नाही हा सर्वमान्य नियम. | २. पूर्वजांनी घालून दिलेले नियम व पध्दती जशीच्या तशा पाळणं. त्याचं पुनर्मूल्यांकन न करणं. म्हणजेच ज्ञानापेक्षा व्यक्तीला महत्त्व. । ३. संशोधन करून नवं तंत्रज्ञान, बाजार पध्दती शोधण्यापेक्षा आहे ते राखणं व धोका न पत्करता सुरक्षित जगण्याकडे कल. | ६. पारंपरिक ज्ञान हेच श्रेष्ठ असून त्यानुसारच व्यवहार चालला पाहिजे हा दंडक. अरपतन किंवा बदलाला कोणत्याही क्षेत्रात वाव नाही. | १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात पाश्चिमात्य पध्दतीच्या औद्योगिक क्रांतीची ॐात झाली. पण समाज मनावर या चारीही वैशिष्ट्यपूर्ण दोषांचा प्रभाव इतका होता। उद्योगक्षेत्रातही त्यांचा शिरकाव झाला. समाजाच्या विविध घटकांची मानसिकता अशाच राहिली. प्रगत विज्ञानाच्या आधारावर उभारल्या गेलेल्या उद्योगांमध्ये "च्या विभागणीत जातिव्यवस्थेचे दर्शन घडू लागले. मालकी व उच्च व्यवस्थापकीय लणाच्या हातात, निम्न स्तरावरील व्यवस्थापकीय पदं मधल्या जातींच्या हातात, रकुनी स्वरूपाची कामे निम्न मध्यमवर्गीयांकडे तर कष्टाची व खालच्या दर्जाची जमजली जाणारी कामे खालच्या जातींकडे अशा प्रकारे कामांची विभागणी होऊ गली. वास्तविक उद्योगक्षेत्राच्या दृष्टीने अशी अवैज्ञानिक पध्दतीची विभागणी घातक 1. कोणताही उद्योग चालवायचा असेल तर तो गरुडाच्या पध्दतीनेच चालवावा लागतो. कासवनीती तेथे उपयोगी पडत नाही. तथापि, शतकानुशतके अंगवळणी ली व्यवस्था अचानक काही वर्षात बदलणंही अवघड असतं. स्वातंत्र्यानंतरही गिक्षेत्राला या वैशिष्ट्यपूर्ण समाजरचनेचा जाच जाणवतो आहेच. याखेरीज नव्या तंत्रज्ञानाचं संशोधन व स्वीकार याबाबत कामगार वर्ग आणि यवस्थापन यांची उदासीनता, संस्थेमध्ये कामापेक्षा गटबाजी, व्यक्तिगत हेवेदावे, अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/ ८१ । ।