Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शास्त्रांनी घासला आणि त्यातून ‘यंत्र' नावाचा राक्षस बाहेर पडला. त्याने अल्पावधीतच सारं जग व्यापून टाकलं. यंत्रयुगात करिअर ही संकल्पना चांगली बळकट झाला. हस्तकौशल्याची जागा यंत्राने घेतली. उत्पादन प्रचंड वाढू लागलं. यातून तेजी व मद या दोन नव्या प्रकारांचा परिचय लोकांना झाला. मागणी जास्त व उत्पादन कमी म्हणजे तेजी व मागणी कमी व उत्पादन जास्त म्हणजे मंदी असं सोप्या भाषेत म्हणता येईल. सध्याचा काळ हा महामंदीचा काळ आहे. विविध उत्पादनांनी बाजारपेठा गजबजलेल्या असल्या तरी मालाला खप नाही. त्यामुळे उत्पादन करणा-या कंपन्या कर्मचा-या संख्येत कपात करून उत्पादन व उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आह" त्यामुळे चांगलं करिअर असणारे सुधीरसारखे तंत्रज्ञ अडचणीत आले आहेत. या संकटांवर कशी मात करता येईल ते पुढच्या लेखात पाहू. थासंकटावर मात कशी करणार / ३४