Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक व्यवस्थापकीय चमत्कार झ्या सहका-यांनो, मी हे काय म्हणतो याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्या दामोदर व्हॅली प्रकल्पातून होणारं वीज उत्पादन आपल्याला सहा महिन्यात दुप्पट करावयाचे आहे. वीजमंत्र्यांची अशी मागणी आहे आणि मीही त्यांना तसे अभिवचन दिलं आहे. त्यामुळे माझा. शब्द खरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वाचा आहे.” . , ... , ओरिसातील दामोदर व्हॅली कॉपेरिशन या सरकारी जलविद्युत प्रकल्पाच्या अभियंत्याच्या बैठकीत जनरल भगत बोलत होते. त्यांची या प्रकल्पाच्या अध्यक्षपदी नव्यानेच नियुक्त करण्यात आली होती. पूर्वी ते लष्करात उच्चपदस्थ अधिकारी होते. प्रामाणिक, परख पण अत्यंत ‘सैनिकप्रिय' असा त्यांचा नावलौकिक होता. नेमके हेच गुण राजकारण्यांना आवडत नसतात. म्हणूनच लष्कराचे प्रमुखपद मिळण्याअगोदरच त्यांना निवृत्त करण्या आलं होतं. तथापि, तत्कालीन सत्ताधा-यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरही होता. शिवा त्यांच्यासारख्या मान्यवर अधिका-याला नाराज ठेवणं योग्य नव्हतं, म्हणून दामाद छ. । यो प्रयत्न निधन विधान एव्यवस्थापकीय चर्मकार/२६..