Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/261

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पदांवर स्वतःच्या समाजातील किंवा नात्यातील व्यक्ती नेमल्या जात असत. त्या व्यक्तीही मालकाशी व व्यवसायाशी प्रामाणिक राहत. मात्र, आता हा विश्वास आणि स्वामीनिष्ठा कमी झाली आहे. आयकर, अबकारी कर चुकविण्याच्या आरोपाखाली खटले सुरू असलेले कित्येक उद्योगपती नातेवाईक किंवा आपल्या समाजाच्याच माणसांनी आपल्याला यात अडकवले म्हणून तक्रार करताना दिसतात. म्हणजेच एका बाजूला उद्योगाच्या बदलत्या स्वरूपाचं आव्हान तर दुस-या बाजूला स्वतःच्याच माणसांकडून धोका होण्याची शक्यता अशा कात्रीत कुटुंब नियंत्रित उद्योग सापडले आहेत. त्यामुळे त्यांचे भवितव्य काळजी करण्यासारखं आहे. | कुटुंब नियंत्रित उद्योगांच्या चालकांनी सरंजामी वृत्ती सोडणं हा या समस्येवरील उपाय आहे. उद्योग माझ्यासाठी नसून मी उद्योगासाठी आहे, याची जाणीव ठेवल्यास हा गुंता काही प्रमाणात सुटू शकतो. व्यवस्थापकीय व इतर उच्च पदांसाठी अधिका-यांची | निवड करताना गुणवत्ता हा एकमेव निकष लावण्याची सवयही त्यांनी लावून घेतली | पाहिजे. मी म्हणेन ती पूर्वदिशा असा दुराग्रह न धरता नवे विचार, नव्या संकल्पना | समजून घेणं, आपल्या अनिर्बध अधिकाराचे विकेंद्रीकरण करणं, अहंगंड टाळून तज्ज्ञ व अनुभवी जाणकारांचा सल्ला घेणं, त्यांचा योग्य तो मान राखणं (मग त्या ‘आपल्यापैकी' नसल्या तरी) इत्यादी मार्गानी हे उद्योग या समस्यांमधून बाहेर पडू शकतील. अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/२५२