Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मनुष्यबळ व्यवस्थापन आणि सत्ता नुष्यबळ व्यवस्थापनाची तीन प्रमुख सूत्रं आपण मागच्या लेखात पाहिली. कोणत्याही व्यवस्थापनासाठी व्यवस्थापकाकडे सत्ता असणे आवश्यक आहे. मात्र, सत्ता हे दुधारी शस्त्र आहे. तिचा उपयोग सकारात्मक केल्यासच तो. संस्था, व्यवस्थापन व कर्मचारी यांना फायद्याचा ठरू शकतो. सत्तेचा वापर करताना व्यवस्थापकाला पुढील तीन बाबींचा मोह होऊ शकतो. . १. अधिकारांच्या गैरवापराचा मोह ...... . २. खुशमस्करीचा मोह . ३. गटबाजीचा मोह : . अधिकाराचा गैरवापर : अधिकार हातात आला की, तो टिकविण्यासाठी त्याचा गैरवापर करण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. याचा फटका कनिष्ठ कर्मचा-यांना बसतो. या मैरवापराला उघड विरोध करण्याचे धाडस कनिष्ठांनी दाखविलं नाही, तरी अशी व्यवस्थापकाला ते मनापासून सहकार्य करीत नाहीत. आपल्या अधिकारातील विभागाची सर्व कामें व्यवस्थापक स्वतः करू शकत नाहीत. त्याला कनिष्ठ कर्मचा-यांवर अवलंबून राहावं लागतंच. त्यांनी केवळ ‘सांगितलेलं काम करणं' हे ध्येय ठेवल्यास व्यवस्थापकाचीच अडचण होते. त्यामुळे आपल्या अधिकारांत कनिष्ठांनाही वाटेकरी करून घेणं हा अधिकारांचा वापर करण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. यामुळे आपोआपच जबाबदा-यांचेही विकेंद्रीकरण होतं आणि व्यवस्थापकाचं काम सोपं होतं. आपला व्यवस्थापक 'हुकुमशहा' नाही ही। भावना निर्माण झाली की कनिष्ठ कर्मचारीही स्वतःच्या पुढाकारानं अनेक कामं बिनबोभाट करतात. स्वतःच्या अड़चणी न घाबरता मांडू शकतात. या मोकळ्या वातावरणामुळे विभागाची कामगिरी अधिक सुधारते असा अनुभव आहे. मात्र, अधिकाराचे विकेंद्रीकरण कसं आणि किती प्रमाणात करावं हे व्यवस्थापकाच्या कौशल्यावर अवलंबून आहे. आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा नेमका उद्देश कोणता आहे याची सूक्ष्म जाणीव व्यवस्थापकाला असेल तर तो या अधिकारात कुणाला, किती प्रमाणात आणि कसं वाटेकरी करून घ्यावयाचं याचा आडाखा अचूकपणानं बांधू शकतो. अन्यथा मानवबळ व्यवस्थापन आणि सती/२४१