Jump to content

पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/206

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विकसित देशांतील पैसा बाहेर जाऊ लागतो. तेथील नोक-या कमी होतात. मग तो एक राजकीय मुद्दा बनतो. तेथील समाजात नाराजी निर्माण होते. भौगोलिक सीमारेषांचं महत्त्व कमी करणं आणि अंतिमत: सीमाविरहित जग निर्माण करणं हा या समस्येवर उपाय आहे. या नव्या सीमाविरहित जगात उत्पादनं, माणसं आणि सेवा कुठूनही कुठेही मुक्तपणानं संचार करू शकतील ही जागतिकीकरणाची प्रक्रिया गॅट करारानं यापूर्वीच सुरू केली आहे. सर्व देशांनी आयात मालावरील सीमाशुल्कात कपात करावी आणि उत्पादनं, त्यांची गुणवत्ता आणि संशोधन यावर भर धावा अशी शिफारस या करारात आहे. आऊटसोर्सिंगच्या माध्यमांतून मुक्त व्यापाराचं अदष्ट काही प्रमाणात साध्य झालं आहे. मात्र, मुख्य अडचण माणसांच्या मुक्त स्थलांतराची आहे. मुक्त व्यापाराचं समर्थन करणारे अनेक देश इतर देशांतील लोकांना आपल्या देशात स्थलांतरित होण्यास प्रतिबंध करतात. आपले आणि परके ही भावना त्यक देशाच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात टिकून आहे. ती सहजासहजी दूर होणेही अशक्य आहे. अलि , . स्थलांतरावरील कठोर प्रतिबंधांमुळे बेकायदेशीर देशांतराचा गंभीर प्रश्न अनेक समोर आ वासून उभा आहे. एखाद्या तुलनेनं विकसित राष्ट्रात त्याच्या अवतीभोवतीच्या विकसित देशांतील लोक घुसखोरी करतात. मेक्सिकोतील लोक अमेरिकेत घुसखोरी "त. इतकंच नव्हे तर बांगला देशातील लोक भारतात घुसखोरी करतात. आपल्या पक्षी शेजारच्या देशात अधिक चांगलं जीवन जगायला मिळेल या भावना हे या स्थलांतरापाठीमागचं एक कारण आहे. या झपाट्याने बदलणा-या पाश्र्वभूमीवर उद्योग व्यवसायाच्या व्यवस्थापनाची शैली १२ण आवश्यक आहे. त्याबद्दल पढच्या लेखात पाह. अदभुत दुनिया व्यवस्थापनाची/२०६