मिळणारी कमाई सर्व काही अगोदरच ठरलेलं असतं, आणि त्यात बदल होण्याची संधीही नसते. अशांना खास प्रशिक्षण ते काय देणार आणि दिलंच तर त्यांना त्यात काय स्वारस्य वाटणार? शिवाय, त्यामुळे त्यांच्यात सुधारणा तरी काय होणार? मग त्यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षण कार्यशाळा अयशस्वी ठरल्या तर नवल नाही. प्रशिक्षकाची पात्रता : । सरकारी कर्मचा-यांना प्रशिक्षण देणान्यांची निवड योग्य पध्दतीनं केली जात नाही असं आढळून आलं आहे. तसंच प्रशिक्षकाच्या शैक्षणिक पात्रतेबाबत प्रशिक्षणार्थी समाधानी नसतात असाही अनुभव आहे. उदाहरणार्थ आयएएस अधिका-यांना प्रशिक्षण देण्यासाठी एखाद्या बिगर आयएएस तज्ज्ञाची नेमणूक केल्यास ते अधिका-यांना कमीपणाचं वाटतं. मग ते प्रशिक्षणात रस घेत नाहीत. हे टाळण्यासाठी निवृत्त आयएएस अधिका-यांना नेमावं तर त्यांना बदलत्या परिस्थितीची जाणीव कमी असण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशिक्षण अर्थहीन होतं. प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाबद्दलही असंच म्हणता येईल. तो ठरविताना प्रशिक्षणार्थीचं में वे शैक्षणिक पात्रता लक्षात घेतली पाहिजे. ‘फोकस्ड्' किंवा विवक्षित मुद्यांवर भर थारा अभ्यासक्रम आणि शिकविण्याची साधनसामुग्री तयार केली पाहिजे. शिकविताना ली जाणारी उदाहरणं किंवा दाखविली जाणारी प्रात्यक्षिकं आवश्यकतेनुरूप असावयास वात, पण बहुतेक वेळा ही पथ्यं पाळली जात नसल्यानं अशा प्रशिक्षणाची अवस्था . भाले घातले रडाया, नाही आसू नाही.माया' अशीच होते. . तथापि, सरकारी अधिका-यांसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता नाही असा त्याचा नाही. वरील मुद्यांचा विचार करून ते दिल्यासच त्याचा फायदा होऊ शकेल. | D . . . • ६ अदभुतदुलियाव्यवस्थापनाची/१७
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/184
Appearance