होता. एखाद्या व्यक्तीची क्षमता आजमावून संस्था तिची सल्लागार म्हणून नियुक्ती करीत असत. संस्थेला कोणत्याही बाबतीत अडचण अगर समस्या आली की, तिचा सल्ला घेतला जात असे. आताही ही पध्दत सुरू आहे. पण स्वतंत्र सल्लागार संस्थांची जबरदस्त स्पर्धा जाणवू लागली आहे. | काही वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया प्राध्यापक ईश्वर दयाळ यांचा सल्ला घेत, असे. आता तिनं मॅक कॅन्सी या सल्लागार कंपनीकडे हे काम सोपवलं आहे. तसंच राज्याच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थापनाबाबत आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री एन.टी. रामारांव, मिनू रुस्तुमजी या नावाजलेल्या व्यवस्थापन तज्ज्ञांचा सल्ला घेत असंत. चंद्राबाबू नायडूंनी ही जबाबदारी मॅक़ कॅन्सी कंपनीवरच सोपविली आहे. स्पेशलायझेशन : | एका व्यक्तीपेक्षा संस्थेकडे सल्ल्याचं काम देण्याकडे कल वाढण्याची काही सबळ कारणं आहेत. एका व्यक्तीपेक्षा संस्थेचा आवाका मोठा असतो. तिथे अन व्यक्ती काम करीत असल्याने कामाची विभागणी सुयोग्य पध्दतीनं केलेली असत. व्यवस्थापनशास्त्रातही आता वैद्यकीय व्यंवसायाप्रमाणं ‘स्पेशलायझेशन' आलेले आ त्यामुळे एकाच व्यक्तीला व्यवस्थापनाचे सर्व पैलू माहीत असण्याची शक्यता क असते. संस्थेत अनेक तज्ज्ञ काम करीत असल्याने संस्थेच्या गरजेप्रमाणं सल्ला संस्था त्या - त्या तज्ज्ञांची नियुक्ती करून समस्या सोडवू शकते. ज्ञानवैविध्याबरोबरच सल्लागार संस्थेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळविण्यासा क्षमता स्वतंत्र व्यक्तीच्या तुलनेत अधिक असते. कारण संस्थेकडे पैसा व मान अधिक असतं. एक व्यक्ती व्यवस्थापनाच्या एकाच पैलूपुरतं सर्वंकष ज्ञान l तंत्रज्ञान मिळवू शकेल ती सर्वज्ञानी असू शकत नाही. '. व्यक्तीचं वय वाढतं तशी तिची नवीन ज्ञान स्वीकारण्याची क्षमता कमी होत पण संस्थेत नित्ये नव्या व तरुण कर्मचा-यांची भरती होत असल्यानं ती चिरतरुण शकते. परिणामी एकेकाळी अनुभव वयावर व ज्ञान अनुभवांवर अवलंबून असत" मानलं जात होतं. पण आता तंत्रज्ञानात झपाट्याने सुधारणा व बदल होत असर ताज्या ज्ञानाला मागणी अधिक आहे. सल्लागार संस्थेचं वय कितीही अधिक अस' भी तेथे काम करणारे व्यवस्थापक तरुण असू शकतात. असं एका स्वतंत्र व्यक्त सतं असं घडू शकत नाही. या सर्व कारणांमुळे एका व्यक्तीचा सल्ला घेण्यापेक्षा संस्थेकडे काम सोपव पसंत केलं जातं. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर सल्लागाराचं काम करणा-याचा परिस्थिती अवघड झाली आहे. व्यवस्थापकीय सल्लागार/१५४ :...।
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/153
Appearance