त्यामुळे इतरांनाही कामचुकारपणाचे व्यसन लागावं यासाठी ते प्रयत्न करतात. असे केल्यास आपण एकटे पडणार नाही अशी त्यांची भावना असते. ‘प्रवासी'पणा हा देखील एक संसर्गजन्य रोग आहे. अशा कर्मचा-यांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचल्यास संस्था कोसळते. कामसू व प्रवासी कर्मचा-यांचे व्यवस्थापन : कामसू कर्मचा-यांचे व्यवस्थापन करणं सोपं असतं. त्यांना फारसं काही सांगाव लागत नाही. ते स्वतःच पुढाकार घेऊन आपले काम करीत असतात. प्रवासी कर्मचा-यांना हाताळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्यांना एकटं पाडणव इतरांच्या संपर्कात फारसं येऊ न देणं, त्यांना काढणं शक्य नसल्यास किमान त्याचा इतरांना त्रास होणार नाही किंवा इतरांच्या कामात त्यांचा विनाकारण हस्तक्षेप होणार नाही अशा प्रकारची कामं त्यांना देणं शक्य असतं. ज्या ठिकाणी कामगार संघटना बळकट आहेत (उदाहरणार्थ, सरकारी कार्यालये, बँका, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तेथे अशा कर्मचा-यांना सरळ घरी बसवणं अशक्य असतं. प्रवासी कर्मचा-या त्याच्याकडून केली जाणारी किमान अपेक्षा तरी पूर्ण करावी व दुस-याच्या कामा कारण नसताना ढवळाढवळ करू नये. मग त्याला हात लावला जाणार नाही अ अॅडजेस्टमेंट कित्येक ठिकाणी बॉस व असा कर्मचारी यांच्यात होते. ज्या ठिकाणी व स्वत: कामसू असतो तेथे अशी जुळणी यशस्वी होते. | कामसू व प्रवासी हे दोन्ही कर्मचारी वर्गाचे व्यवस्थापन सुयोग्य पध्दतीने कर यात व्यवस्थापकाच्या कौशल्याची कसोटी लागते. या दोन्ही वर्गांचा प्रभाव मध सर्वसामान्य कर्मचारी वर्गावर पडत असतो. व्यवस्थापन सुदृढ असेल तर काम वर्गाचा प्रभाव अधिक पडेल. ते ढिले असेल तर प्रवासी वर्गाची सरशी होईल संस्थेची हानी होईल. " चालकांचे सहकार्य आवश्यक कामसू कर्मचा-यांची संख्या वाढू देण्यात व्यवस्थापनाचं खरं कौशल्य : मधल्या वर्गातील अधिकांश कर्मचा-यांना कामसू बनविणं हे कामगार व्यवस्थापनासमा आव्हान असतं. या कामी संस्था चालकांचं मनापासून सहकार्य असणं गरजेचं आ याची त्यांच्या कामगिरीवरून पारख करण्याचे स्वातंत्र्य संस्था चालकांनी व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी व्यवस्थापन व चालक यांच्यात परस्पर विश्वास सततचा संपर्क असणं महत्त्वाचं आहे. या सहकार्यात सर्वात महत्त्वाचा अडसर नातेवाईकबाजीचा असतो. अमुक कर्मचारी केवळ चालकाचा नातेवाईक आहे किंवा त्याचा संबंधित आहे म्हणून त्याला सांभाळून कर्मचारी : कामसूद ‘प्रवासी’/११४
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/123
Appearance