अशाच आठ ते दहा श्रेणी असत. याला ‘व्यवस्थापनाची उभी पध्दत' (व्हर्टिकल मॅनेजमेंट) म्हणत. | सध्याच्या स्पर्धेच्या युगात ही रचना महागडी ठरू लागली आहे. कारण यात व्यवस्थापकांची संख्या नको इतकी जास्त होते. शिवाय वरचे काही स्तर सोडले तर मधल्या व खालच्या स्तरातील व्यवस्थापकांना वरिष्ठांकडे ‘रिपोर्ट करणं याखेरीज काही अर्थपूर्ण कामही नसतं. त्यामुळे आता व्यवस्थापकांची संख्या कमी करण्याकडे व असलेल्या व्यवस्थापकांवर जास्त जबाबदारी टाकून ती पार पाडण्यासाठी अधिकारी अधिक देण्याकडे उद्योगांचा कल आहे. परिणामी देशातील सुप्रसिध्द व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधून अव्वल गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या व्यवस्थापकांनाही अवेळी ‘निवृत्त व्हावं लागत आहे. या पध्दतीने अनेक समस्यांना जन्म दिला आहे.' जीवनशैलीवर परिणाम : . | स्वेच्छानिवृत्ती होताना एकटाकी मोठी रक्कम हातात पडणं हा फायदा असला सध्या व्याजाचे दर इतके कमी आहेत की, त्यातून पगाराची भरपाई होत नाही: साहजिकच उत्पन्नाचा अन्य काही मार्ग नसेल तर पूर्वीपेक्षा स्वस्त जीवनशैली आचरण आणावी लागते. या परिस्थितीबरोबर जुळवून घेणं मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण जा काम गेल्यामुळे आलेल्या निराशेचाही विपरीत परिणाम होतो. समाजातील आपली प घसरल्याची जाणीव होते. विशेषत: पूर्वी उच्चपदस्थ असणा-यांच्या बाबतीत ही जा अधिकच बोचरी असते. कौटुंबिक संबंधांवर परिणाम । घरातील कर्त्या पुरुषाला किवा स्त्रीला काम नसेल तर अनेक कौटुंबिक समस्या निर्माण होतात. दिवसभर कामानिमित्त घराबाहेर असणारा मनुष्य काम संपवून घ आला की कुटुंबीयांशी शक्यतो संघर्ष न करता प्रेमाने वागण्याचा त्याचा प्रयत्न अस कारण घरच्याशी त्याचा संपर्क फार कमी वेळ असतो. मात्र, तो अधिक काळ १ राह लागला तर छोट्या मोठ्या गोष्टींवरून वाद निर्माण होतात. त्याचे पर्यवस' कौटुंबिक कलहात होतं. अशा ‘सक्षम बेकारांची संख्या वाढल्याने एकंदर समाज नीतिधैर्य खचतं. ‘त्या आतासारखा उच्चशिक्षित माणूसही बेकार झाला, मग आ य होणार' या विचाराने सर्वसामान्य माणसं हादरून जातात. परिस्थिती आहे त्या" जास्त भयानक वाटू लागते. समस्येवरील उपाय : ‘सबका मुदावा कर डाला अपना ही मुदावा कर ना सके। सबके गिरबाँ सी डाले अपनाही गिरेबाँ भूल गये। स्वेच्छानिवृत्ती :घरघर की कहानी / ११०
पान:अदभूत दुनिया व्यवस्थापनाची.pdf/119
Appearance