पान:अग्निमांद्य.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

<s औषधांच्या (खैर, वड, बाभूळ, बकुळ वगैरे) सालींचा काढा करून त्याचे गुळणे करावेत. किंवा दारुहळद, गुळवेल, हरडा,बेहडा, आंवळकाठी, द्राक्षे, जाईचा पाला, धमासा हीं आठ औषधे प्रत्येक पाव तोळा घेऊन त्यांच्या काड्याचे गुळणे करावेत. कधीं नुस्ल्या मधाचे गुळणे केल्यानेंही तोंडांत झालेले व्रण बरे होतात. इंग्रजी औषधे मिळण्यासारखी असल्यास पोटॅशूढोरस् ग्रेन्स् १५ व पाणी १ औस याचे किंवा ग्लायुको थाय्सोलीन् १ औस व पाणी ४ औस याचे गुळणे केल्यानेंही फायदा होतो. पुष्कळदां टंकणखार, सोनगेरू किंवा बिस्मथू सब्नायूट्स् यांपैकी एखादे १५ ग्रेन्स् व १ ड्राम मध । किंवा ग्लिसरीन यांमध्यें मिळवून तोंड आलेल्या भागास लावल्यानें चांगला उपयोग होतो. कित्येकदां व्रणावर काताची बुकी लावल्यानें किंवा वर सांगितलेल्या ग्राही औषधांच्या सालींच्या काढ्यांत किंवा पाण्यांत तुरटी दर औसास ५ ग्रेन्स् टाकून गुळणे केल्यानें व्रण बरे होतात. इतकेंही करून जर त्रण बरे होते नुसले तर त्यांव्र सिल्व्हर नाय् टेट्चें सोल्यूशन् (सिल्व्हर नाय्ट्रेट् १० ग्रेन्स् व बाष्पोदक १ औस) कापसाच्या बोळ्यानें दिवसांतून १-२ वेळ लावावें म्हणजे व्रण लवकर बरे होतात. जर तोंडाला घाण येत असेल तर तिचें कारण शोधून काढून |ंदूर कर्वें. दांत साफ नसल्यास ते साफ करावे; त्यांच्यावर मळाची किटें असल्यास तीं दंतवैदूकडून काढून टाकावी. तसेंच दांतांच्या प्र्क मळ सांचलेला असला अगर अन्न राहून कुजलेलें असलें तर तें काढून टाकावें. कोणताही पदार्थ खाल्यावर तोंड साफ धुवून टाकावें. रोज दोन वेळ दंतधावन करून दांत साफ राखावेत. यासुाठीं दंतधावन चूर्णतु सुगंधी, जंतुनाशक व जेणेंकरून दांत साफ होऊन घाण नाहींशी होईल असे पदार्थ असावेत. अशा प्रकारचें भंजन करणें झाल्यास तें खालीं दिल्याप्रमाणें तयार करून ठेवावें.