पान:अग्निमांद्य.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

4. औषधे मिळण्यासारखीं नसतील त्यांनीं पंचकोलचूर्ण, तालीसैादिचूर्ण, वैवानीखांडवचूर्ण, दाडिमैाटकचूर्ण, यांपैकीं एखाद्या चूर्णाचा उपयोग करावा. यांनीं अग्रि प्रदीप्त होऊन अरुचि नाहींशी होते. अगर माहाळुंगीचे फळांतील केशर, सेंधव, सुंठ, मि-यें, पिंपळी हीं थंड पाण्यांत वाटून त्या पाण्याचे दिवसांतून २-३ वेळ गुळणे करावेत. जेवणाचे आरंभीं आलें, मीठ, लिंबु, यांचा उपयोग करावा म्हणजे अरुचि नाहींशी होते. याशिवाय अप्रत्यक्ष रीतीनें अरुचि नाहींशी होईल अशा प्रकारचें अन्न सेवन करावें. उदाहरणार्थ, अन्नांत आवडणारे व सहज पचतील असे पदार्थ असावेत. तोंड येणें:-यांतही वर सांगितल्याप्रमाणें कारणांचा प्रतीकार करावा. अन्न मसालेदार पदार्थीचें नसावें. अन्नांतील पदार्थ हलके असावेत. औषधी उपचारांमध्यें वरील प्रमाणेंच पहिल्यानें • पचनक्रिया सुधारावी. मलावरोध असल्यास रेचक देऊन दूर करावा. तोंडांतील व्रण बरे होण्याकरितां निरनिराळ्या ग्राही १-पिंपळी, चवक, सुंठ, पिंपळमूळ, चित्रक हीं पांच औषधं समभाग घेऊन त्यांचें वत्रगाळ चूर्ण करावें. मात्रा (Dose) ६ पासून १२ गुंजा. २-तालीसपत्र १ तोळा, मि-यें २ तोळे, सुंठ ३ तोळे, पिंपळी ४ तोळे, वंशलोचन ५ तोळे, वेलची आणि दालचिनी हीं अर्धा अर्धा तोळा. याप्रमाणें चूर्ण करून त्यांत ३२ तोळे साखर मिळवावी. मात्रा १२ पासून २४ गुंजा. ॥ ३-अजमोदा, डाळिंब, सुंठ, चिंच, अम्लवेतसू, आंबट बोर ही सहा और्प, चार चार तोळे घ्यावी; मि-यें अडीच तोळे, पिंपळी दहा तोळे, दालचिनी, पादेलोण, धणे, जिरें हीं चार औषधे दोन दोन तोळे; साखर चौरं_`~ याप्रमाणें सर्व औषधांचें चूर्ण करून एकत्र मिळवावें. मात्रा १२ पासून २४ गुंजा. ག། ། ४-डाळिंवसाल २ तोळे, खडीसाखर आठ तोळे; वेलची, दालचिनी, तमालपत्र हीं तीन मिळून १ तोळा, सुंठ, मिरें, पिंपळी हीं प्रत्येक एकेक तोळा; प्रमाणें सर्वांचें चूर्ण करून एकत्र मिळवावें. मात्रा पावते अर्धा तोळा.