पान:अग्निमांद्य.pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

<ミ संचार करूं दिल्यानें त्या विचारांचा परिणाम पूर्ण स्थितीला न पावलेल्या अशा वीर्योत्पादक पिंडांवर होऊन रेतस्खलन होऊं लागतें, क्षीणता येते, अग्रिमांद्य होतें व अकालीं वृद्धावस्था प्राप्त होते. मात्र कोणीं असें समजू नये कों, गृहस्थाश्रमामध्यें विषयसुखांत मग्र असल्यास चालेल. परंतु गृहस्थाश्रमामध्यें देखील त्याचें अतिक्रमण केल्यानें वरीलप्रमाणेंच अशक्तपणा, निरुत्साह, स्मरणशक्ति कमी होणें, क्षुधामांद्य वगैरे विकार जडतात हैं विसरतों कामा नये. यासाठीं ज्यांनां अग्रिमांद्य न होतां शरीरप्रकृति सदृढ रहावी अशी इच्छा असेल त्यांनीं या बाबतींत 'व्यवस्थेशीर वागण्याची खबरदारी ' घ्यावी. २ रोगपरिहार्क (औषधि) उपायः–औषधी चिकित्सेसंबंधानें या ठिकाणों फार खोल जावयाचें नसून साधारण रीतीनें लोकांनां सहजगल्या करितां येतील अशा उपायांचा विचार करणें आहे. कारण रोगाचें तसेच उग्र स्वरूप असल्यास त्या वेळीं वैद्याचा सल्टा घेण्याशिवाय गल्यंतरच नाहीं. आतां मागील भागांत वर्णन केलेल्या लक्षणांच्या क्रमानें उपचारांचा विचार करूं. अरुचि:-ही पूर्वी सांगितल्याप्रमाणें पचनक्रिया बरोबर न झाल्याकारणानें होत असते. यासाठीं पचनांत कोठे बिघाड झाला आहे याचा शोध करून त्याचें कर्ण काढून टाकावें. अरुचि औषधा-शै शिवाय स्वाभाविक रीतीनें बरी होते किंवा नाहीं हैं आधीं पहावें. उदाहरणार्थ, तापांतील अरुचि ताप गेल्यावर आपोआप नाहींच्या होते. तसेच अग्रिमांद्यामुळे आलेली अरुचि अग्रिमांद्य दूर झाल्यावर नाहींशी होते. अरुचि सुधारण्यासाठीं मुख्य उपाय म्हणजे जेणेंकरून

  • रघुवंशाच्या पहिल्या सर्गात महाकवि श्रीकालिदास ह्मणतात की, 'प्रजायै गृहमेधिनाम.” याचा हेतु देखील ख्रिसुखाचा उपभोग घेणें तो जास्त नसून . माफक असावा; हाच होय.