* R वाटतो. इतर गोष्टींकडे आपण जेवढें लक्ष्य पुरवितों त्याच्या शतांशानेंही आपण या गोष्टींकडे लक्ष्य देत नाहीं. आपल्याला या गोटीचें अगल्यच वाटत नाहीं. आरोग्याची हेळसांड होऊन त्याचे परिणाम भोगावे लागले म्हणजे मग मात्र आम्ही धांवपळ करावयाला लागतों. अशा प्रकारें शरीराविषयींची अनास्था वाढत जाऊन आपल्या शक्तीचा उत्तरोत्तर -हास होत चालला आहे, आणि त्याचें प्रायश्चित पुढील पिढीस अवश्य भोगावें लागणार आहे. बालविवाहाची चाल पासून ब्रह्मचर्यावर अकालीं घाला येतो, शक्तीच्या वाढीस आळा बसतो, व शरीर बनण्याच्या आधींच शरीराच्या -हासास प्रारंभ होतो. अशा स्थितींत झालेली संतति खुजट, दुबळी आणि रोगट निपजली तर त्यांत आश्चर्य कसलें ? संतति वाढू लागल्यामुळे घरांत येणारें उत्पन्न पुरेनासें झालें ह्मणजे जमाखर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठीं घरच्या मालकाला जास्त श्रम व काळजी वहाणें अर्थातच भाग पडतें. इतर परिस्थितिही दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. बाजारभाव व जागेचें भाडें हीं वाढत चाललीं आहेत. पोटाला चांगलें पौष्टिक अन्न भरपूर मिळेनासें झालें आहे. मुंबईसारख्या शहरीं तर जागेचें भाडें वाढल्यामुळे गरिबीच्या मानानें थोड्या खर्चात चांगली जागा मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे जशी बरीवाईट जागा मिळेल तिच्यांतच राहणें भाग होऊन शुद्ध हवेस अंतरावें लागत आहे. अर्थातच दुखण्यांनाहि ऊत आला आहे. तशांत जीवापाडा, श्रम करून गरीबींत थोडाबहुत मिळविलेला पैसा चहा, कॉफी, तंबाकू, दारू, भांग, गांजा इत्यादि शरीरघातक व्यसनांत खर्च होऊन श्रीर क्षीण होत चाललें आहे. उद्योगधंद्यांत उत्तेजन नसल्यामुळे व तो करण्याचीं साधनेंही अनुकूळ नसल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न दत्त ह्यणून सदोदित पुढ्यांत उ राहून नोकन्या पहाणें भाग पड़ें लागलें आहे; पण त्यांतही पाठू असलेत्या भयंकर चढाओढीमुळे कितीतरी त्रास सोसून मोठमोठ्या परीक्षा
पान:अग्निमांद्य.pdf/9
Appearance