पान:अग्निमांद्य.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

<R ताकापासून एक मोठा गुण आहे तो हा कीं, केंस पिकणें, त्वचेला सुरकुल्या पडणें, अंगाचा वर्ण फिरणें, व आणखी कांहीं रीतींनीं माणसाला अकालीं उतारवयाची झांक मारणें, हीं नाहींशीं होतात. याचें कारण असें असतें कीं, रक्तमांसांत चुन्याचे वगैरे जे क्षार असतात ते रक्तवाहिन्यांच्या पडद्यांत जमून त्यांचा त्यांच्या आंतल्या बाजूला पातळ पापुद्रा (थर) बनतो. मग हळुहळु हा थर वाढत जाऊन तरुणपणींचा लवचिकपणा कमी होतो व उतारवयाचा कडकपणा रक्तवाहिन्यांच्या अंगीं येऊन त्यामुळे शरीराचें चांगलें असतात. यासाठीं असें दहीं विरजणास न घेतां दहीं करण्यासाठीं येणा-या चाक्या (ल्याक्टोबॅसिलीन् किंवा फर्मेन्ल्याक्टिलु) आणून त्यांचा उपयोग करावा. फर्मेन्लॅक्टिलच्या ५॥६ चाक्या घेऊन त्यांची चुकी करावी. ती वर सांगितलेल्या उष्णतेच्या सोळा ऑस दुधांत चांगली मिसळावी. ज्यांना अशा प्रकारच्या जंतूंचें विरजण वापरणें योग्य वाटत नसेल त्यांनीं एक वेळा शेजारच्या माणसाकडचें किंवा निरुपायास्तव बाजारी आणून विरजण लावावें व वर सांगितलेली खबरदारी घ्यावी. अशा रीतीनें काळजीपूर्वक रोज रोज नवें दहीं वनवीत जावें म्हणजे आंत इतर दुसरे जंतु जाणार नाहींत व मुळांत जे कांहीं आलेले असतील ते ल्याक्टिक् आसिडानें मरून ज्ञातील. तरी पण ल्यावटोर्वेसिलीन् किंवा फर्मेन्ल्याक्टिल वापरणें हें सर्वात चांगलें. १०४° डिग्रीपेक्षां दुधाची उष्णता जास्त असली तर हे जंतु निर्बल होतात किंवा. मरून जातात, ही गोष्ट लक्षांत ठेविली पाहिजे. गरम भातावर दही' किंवा ताक घेऊं नये म्हणून सांगतात त्याचा हेतु हाच आहे. अर्थातू त्याची कढी केल्यानें फायदेशीर होणार नाहीं हें निराळे सांगावयास नकोचतसंच दह्यांत किंवा ताकांत मीठ मिसळून ठेऊन फार वेळ झाला तर त्यापासून हे जंतू मरतात. म्हणून जेवणापूर्वी त्यांत मीठ मिसळून ठेऊं नये. वेळींच जेवतांना मीठ मिसळून जेवावें. कित्येक तुरटी किंवा लिंबाच्या रसापासूनही दहीं बनवितात, पण त्यांत कांहीं अर्थ नाही; कारण त्यांत वर सांगितलेले जंतु नसतात. अशा दह्यानें खोकला वगैरे होण्याचा मात्र संभव आहे. अग्नि० ६