पान:अग्निमांद्य.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

<1 о चांगल्या रीतीनें तयार केलेलें नसतें व तें उघडें राहिल्यानें लांत Y sa - ܟܕ YM शेंकडों हानिकारक जंतूंची वाढ झालेली असते. यासाठीं ताक करणें तें *पाश्चात्य वैद्यशास्त्रोत पद्धतीनें काळजीपूर्वक करावें.

  • ताकाची कृति:-ताक करण्यासाठीं पहिल्यानें दुधाचें दहीं बनवावें लागतें. वास्तविक पहातां दुधाचें दहीं होणें ह्मणजे लांत एक प्रकारची विकृति उत्पन्न करणें हें आहे. दुधांत एक प्रकारचे जंतु-ज्यांना ल्याक्टिकू जंतु ह्मणतात ते-उत्पन्न होऊन त्यांची वाढ झाली, ह्मणजे त्यास आपण दहीं असें ह्मणतों. दहीं करण्यासाठीं चांगलें दूध आणून तें पहिल्यानें पंधरा मिनिटेंपर्यंत उकळवावें ह्मणजे त्यांत आधीं कांहीं जंतूंचा प्रवेश झालेला असल्यास ते मरून जातील. नंतर तें साधारण आपल्या रत्ताच्या उष्णतेहून जरा जास्त गरम राहील अशा बेतानें थड होऊँ द्यावें. कारण दुधाची उष्णता जास्त असली तर त्यांत दहीं बनविण्यासाठीं घातलेल्या विरजणांतील जंतु निर्बल होतात. व वर सांगितलेल्या उष्णतेहून कमी असल्यास शिथिल व गाफिल होऊन त्यांचे व्यापार बंद पडतात. याकरितां दहीं बनविण्यासाठीं दूध घेणें तें १०४° डिग्री उष्णतेचें असावें. उष्णता जाणण्यासाठीं उष्णतामापक यंत्र असलें तर फार उत्तम. पण तें नसल्यास हें जाणण्याचा सोपा मार्ग ह्मणजे दुधांत बोट घातलें असतां तें दूध साधारण गरम लागलें ह्मणजे उष्णता बेताची आहे असें समजावें. दहीं बनविण्यासाठीं कांचेचें भांडें फार उत्तम. दह्यांचें भांडें वापरण्यापूर्वी उकळल्या पाण्यानें दोन तीन वेळां साफ धुवून टाकावें. नंतर त्यांत वरील उष्णतेचें दूध घालून त्यास विरजण घालावें व भांडें चांगल्या बंदोबस्तानें चुलीच्या बाजूला साधारण गरम अशा जागीं झांकून ठेवावें. दह्यास विरजण लावल्यापासून त्यांत लॅयाची क्रिया घडून येण्यास दहा बारा तासांचा अवधि लागतो. नंतर हें तयार झालेलें दहीं घेऊन त्यांत थोडें खच्छ थंड पाणी घालावें व रवीनें घुसळून वर आलेलें लोणी निराळे काढावें. लोणी काढून राहिलेला जो प्रवाही पदार्थ त्यालाच ताक असें म्हणतात. रवीनें घुसळल्यानें जंतु मोकळे होऊन ताकांत येतात. आतां दहीं बनविण्यासाठीं जें विरजण घालावयाचें तें आदल्या दिवसाचें चांगलें असावें. बाजारी नसावें. कारण बाजारी दहीं चांगल्या रीतीनें तयार केलेलें नसल्यामुळे व उघडें राहिल्यानें त्यांत भिन्न भिन्न जातीचे शरीराला अपायकारक असे असंख्य जंतु शिरलेले