पान:अग्निमांद्य.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Ꮩ9 Ꭳ थंड पाणी पिण्याची संवय ठेवावी. गरम पाण्याचा जरुरी पुरताच उपयोग करावा. गरम पाणी पिणा-यांना थंड पाणी पिण्याची संवय करून घ्यावयाची झाल्यास त्यांनीं एकदम थंड पाणी पिण्यास सुरवात न करितां पाण्याची उष्णता हळु हळु कमी आर्यवैद्यकांत पिण्यासाठीं जें सवीत उत्तम जल सांगितलें आहे, तें असें:- पाऊस पडत असतांना रुप्याच्या किंवा कांचेच्या स्वच्छ भांड्यांत थोडा भात घालून तें भांडें पावसांत ठेवावें व तें पाण्यानें भरलें असतां त्यांत घातलेल्या भाताचा वर्ण व शितें स्वच्छ व कायम राहिलीं तर तें पाणी पिण्यालायक समजावें. याला ‘गांग' अशी संज्ञा दिली आहे. पाश्चात्य वैद्यशास्त्रांत देखील औषधे बनविण्यास लागणारें शुद्ध पाणी पावसाचें असतें. हें बाटल्यांत सांठवून ठेवलेलें असतेंव ह्यास युद्धोदक (Aqua. Pura) असें म्हणतात. पावसाचें पाणी जमिनीवर पडून त्याचा ऊन, चांदणें, व वायु यांशीं संपर्क झाला ह्मणजे मग मात्र त्याचा बरेवाईटपणा देशकालावर अवलंबून रहातो. अलिकडे कांहीं लोक जेवतांना बफांचें पाणी पितात; पण ती त्यांची मोठी चूक आहे. त्यामुळे आमाशयाच्या अंतस्वचेंतील रुधिराभिसरणांत फेरफार होऊन जाठररस बरोबर तयार होत नाहीं, व अपचन होण्याचा बराच संभव असतो. माणसाच्या शरीरास लागणारे निरनिराळ्या प्रकारचे क्षार निरनिराळ्या प्रकारच्या पदार्थीपासून थोड्याबहुत प्रमाणानें मिळत असतात. तसेंच हिरव्या भाज्या, निरनिराळ्या प्रकारची फळफळावळ ह्यांत कांहीं विशिष्ट क्षार असतात; ते, तशा प्रकारचे पदार्थ खाले असतां शरीरास मिळतात. प्रकृति स्वस्थ रहाण्यास यांची फार जरुरी, असते. ज्या वेळीं अशा क्षारांचें प्रमाण शरीरांत कमी होतें त्यावेळीं मनुष्याला