पान:अग्निमांद्य.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

WSVS) कमती करीत आणणें हेंच हितावह आहे. असें केल्यानें अखेरपर्यंत लाची प्रकृति निरोगी राहून स्मरणशतयादिकरून ज्ञानेंद्रियें व कमेंद्रियें शाबूत रहातील. जन्मलेल्या मुलाचा आहार वाढत वाढत जातो; तोच क्रम उलट दिशेनें वृद्धांनीही पत्करून आपली इहलोकांची यात्रा संपवावी. येतां जातां, तसेंच जेवणावर, गटागट फार पाणी पिऊँ नये. यामुळे जठराग्रि विझला जाऊन अग्रिमांद्य होतें. म्हणून जेवणावर पाणी पिणें तें जेवणाचे आरंभीं न पितां, शेवटीं फार थोडें प्यावें. शिवाय आंबटी, ताक, कढी, भाजी वगैरे पदार्थात पाणी असतेंच. जेवणानतर तीन चार तासांनीं पाणी पिण्याची संवय ठेवावी. यामुळे जठर साफ होण्यास बरें पडतें. आर्यवैद्यकांत जठराचे चार भाग कल्पून एक भाग पाण्यानें भरावा ( पानेनैकं प्रपूरयेत्) असें सांगितलें आहे. जेवणाचे आरंभीं पाणी प्याल्यानें मनुष्य कृश होतो असें ह्मटल्याचें मागील प्रकरणांत सांगितलेंच आहे. असें होण्याचें कारण आरंभीं पाणी प्याल्यानें जाठररस पातळ होतो व त्यामुळे अथांतच अन्न पचलें न जातां क्षीणता येते. पिण्याचें पाणी स्वच्छ, ताजें, झन्याचें असून थंड असावें. अलीकडे कांहीं ठिकाणच्या लोकांखेरीज सर्वांसच-विशेषतः शहरांतील लोकांस-असें ताजें झन्याचें पाणी मिळणें कठीण. ह्मणून अशा लोकांनीं पाणी पिणें तें-मग तें विहिरीचें असो किंवा नळाचें असोतापवून थंड केलेलें व गाळलेलें प्यावें. गरम पाण्यापेक्षां थंड पाणी पिण्याची संवय ठेवलेली बरी. कारण थंड पाणी विशेष श्रमाशिवाय ~ -व सर्व ठिकाणीं मिळण्यासारखे असतें. कित्येक जण थंड पाणी न पितां गरम पितात व असें गरम पाणी एखाद्यावेळीं न मिळाल्यानें थंड पाणी पिण्यांत आल्यास अन्मार्गाच्या श्लेष्मल त्वचेचा दाह होतो, व तिव्यांतून कफ पडूं लागतो. तसेंच जाठररस व्हावा तसा तयार होत नाहीं व त्यामुळे अपचन होतें. म्हणून सर्व स्थितींत मिळेल असें