पान:अग्निमांद्य.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

\ՏՀ एयास जसे सुलभ पडतें तसें वर सांगितल्याप्रमाणें दाब बसल्यानें पडत नाहीं; याकरितां जेवण झाल्यावर बसण्याऐवजीं थोडा वेळ निजणें अधिक चांगलें. आतां जेवणानंतर निजणें तें डाव्या कुशीवर निजावें. कारण वर सांगितलेंच आहे कीं, आमाशयाला दोन द्वारें असतात. एकांतून अन्न अांत येतें तें वरेचें किंवा ऊध्र्वमुख. दुस-यांतून अन्न आंतड्यांत जातें तें खालचें किंवा अधोमुख. हें दुसरें द्वार ( अधोमुख ) उजव्या बाजूस असतें; व अन्न पचन होऊं लागलें म्हणजे तें या द्वाराने बाहेर पड़ लागतें. आमाशयाचा मोठा भाग डाव्या बाजूस असतो. याकरितां डाव्याबाजूवर निजावें; म्हणजे उजव्या बाजूचे द्वारावर अन्नाचें - दडपण बसणार नाहीं व अन्नाचें पचन चांगलें होऊन तें सावकाश खालीं जाईल. डाव्या बाजूवर निजण्याचें आणखी एक कारण आहे तें हें कीं, उजव्या वाजूला यकृत् व मोठी रक्तवाहिनी असते; तिच्यावर पचनकालीं दाब बसतां कामा नये. जेवणाचे पूर्वी किंवा मागाहून लगेच कोणतेही शारीरिक किंवा मानसिक श्रम करूं नयेत. आर्यवैद्यकांत म्हटलें आहे कीं, ‘सर्वध भाष्याध्वशयनं लयजेत् । पीत्वा भुक्त्वाऽऽतपं वर्निह यानं पुवनवाहनम्॥ खाणें पिणें झाल्यावर सर्वांनाच भाषण, मार्गक्रमण, निद्रा, ऊन, शेक (अग्रि ), चालणें, अश्धादि वाहन व पोहणें ह्या गोष्टी वज्र्य आहेत. अलीकडे जी जेवण होतांच लगेच *धांवपळ करीत शाळेत

  • जेवणानंतर धांवपळ केल्यानें काय होतें तें युरोपांतील एका डॉक्टरानें केलेल्या पुढील प्रयोगावरून स्पष्ट दिसून येतें:-ह्या डॉक्टरानें दोन सारख्या वयाच्या, सारख्या वजनाच्या कुत्र्यांनां एकाच प्रमाणानें अन्न खायाला घातलें व त्यांपेकीं एकास घरांत बांधून, दुस-यास एक दोन तास पर्यंत एकसारखे धांवपळ करीत नेऊन घरीं आणलें. नंतर दोघांचेही आमाशय उघडून पाहिले. त्यांत असें दिसून आलें कीं, धांवपळ करीत नेलेल्या कुत्र्याचे पोटांत जशाचें तसेंच