पान:अग्निमांद्य.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७२ मलत्वाटे निधून जातें. कारण यांत पुरेसें पित्त मिसळलेलैं। नसतें. पुरेसें पित्त मिसळलें असतें तर तें पचलें जाऊन मलावाटेही निघालें नसतें. म्हणून तेल किंवा तूप पचेल अशा मानानेंच खावें. सारांश, कोणता पदार्थ आपल्यास सहज पाचतो, कोणता पचत नाहीं, वगैरे ठरबून ल्याप्रमाणें ज्यानें ल्यानें आपल्या अन्नाचें नियमन करावें. कचीं व नासकों फळें खाऊँ नयेत. तंबाखु, अफ़्र, भांग, गांजा, मद्य वगैरे पदार्थांना स्पर्श देखील होऊं देऊं नये. रात्रौ जागरण व *दिवसा निद्रा हीं वर्ज करावींत. मौंजीबंधनाच्या वेळीं मुलाला *दिवा मा स्वाप' असा जो उपदेश करण्यांत येतो त्याचा हेतु हाच होय. दिवसभर काम करून थकल्याभागल्या शरीरास रात्रीं स्वस्थ झोंप मिळाल्यानें सकाळीं उठल्यावर तें पुन: काम करण्यास ताजेंतवानें होतें, कियेक लोक जेवणानंतर निजतात व लाचें कारण आर्यवैद्यकांत वामकुक्षि करावी म्हणून सांगितलें आहे, असें सांगतात. पण त्या वामकुक्षीचा अर्थ ते ज्याप्रमाणें तासचेतास निजून काढतात ‘त्याप्रमाणें नसून जेवणानंतर विश्रांति व पचनक्रिया सुलभ व्हावी । यासाठी १५-२० मिनिटें अंथरुणावर पडणें या पलीकडे दुसरा नाहीं. दुसरी गोष्ट अशी आहे कीं, जेवणानंतर आमाशय अन्नानें भरलेला असतो; या वेळीं मनुष्य बसल्यानें किंवा उभा राहिल्यानें आमाशयावर अंतःपटला (Diaphragm ) चा दाब बसती व अमिाशष्याचा आंतड्यांवर बसतो. त्यामुळे पचनेंद्रियांचे सर्व भाग मोकळे असत नाहींत, व असें झालें म्हणजे अन्नपचनास थोडी हरकत येते. कारण, प्रत्येक भाग मोकळा असल्यानें त्याला आपलें काम कर

  • यासाठींच आर्यवैद्यकांत 'अकालशयनातू......अभिमंदता” असें ह्मटलें आहे.