पान:अग्निमांद्य.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

v98 मिष्ट किंवा क्षार पदार्थ फार खाऊ नयेत. व तसले पदार्थ खाठे तर त्यांपासून जो तहानेचा शोष पडतो तो शमन करण्यासाठीं चहा, कॉफी, कोको, लेमोनेड, सोडा वगैरे सारखीं शर्करा व क्षारयुक्त पेयें कधींही घेऊं नयेत. कारण अगोदरच रक्तांत साखरेचें किंवा क्षारांचें । प्रमाण वाढलेलें असतें व त्यासाठीं रक्ताला पाण्याची जरूरी असते व म्हणूनच अशा वेळीं असे पेय पदार्थ न पितां नुस्तें पाणी प्यावें तिखट व आंबट खाणेंही माफक असावें. फार चरबी असलेले किंवा तैलयुक्त पदार्थ खाऊं नयेत. किलेकांचा असा समज असती कीं, पुष्कळसें तूप खालें कीं, आपण लठ्ठ होऊं. पण ती त्यांची चूक आहे. एवढी गोष्ट खरी आहे कीं, तेलापेक्षां तूप लौकर जिरतें. कारण तूप हें प्राणिज अन्न असल्यामुळे त्यावर अगोदरच कांहीं संस्कार झालेले असतात व म्हणूनच तें खाल्ठ्यानें पचण्यास तेलाइतके श्रम लागत नाहींत. यासाठींच तूप खाणा-याला तेलावर ठेव ल्यास तें (तेल) पचण्यास फार जड जातें. व कधीं कधीं तें न पचतां कोको वर सांगितलेल्या कॉफी करण्याच्या कृतीप्रमाणेंच तयार करितात, किवा नुस्त्या दुधांत शिजवून साखर घालून तयार करितात. फार दूध घातल्यानें किंवा नुस्त्या दुधांत तयार केल्यानें चहा किंवा कॉफी यांचा खाद जसा नाहींसा होतो तसा कोकोचा होत नाही. कोकोच्या अंगीं मनाला व मज्जातंतूंना उत्तेजित करण्याचा गुण थोडाच असल्यामुळे त्याच्या अतिसेवनानें मज्जातंतूंचा क्षय होत नाहीं. तसंच चहा, कॉफीप्रमाणें कोकोनें निद्रानाशही होत नाहीं. या कारणानें व लाच्या अंगीं असलेल्या पौष्टिक गुणामुळे पेय पदार्थीत कोकोची जास्त योग्यता आहे. चहा, कॉफी व कोको या तीनही पदार्थोपकों कोकोमध्यें पौष्टिक अंश दुसच्या दोहोंपेक्षा अधिक आहे; त्याचे खालोखाल काफींत आहे व चहांत तो मुळींच नाहीं असें ह्यटलें तरी चालेल. उत्तेजक गुणाचे बाबतींत अनुक्रमें कोको, कॉफी व चहा एकाहून एक जास्त उत्तेजक आहेत.