६५९ मिळेल तें खाण्याची जी कियेकांना संवय असते ती किती घातक आहे याची कल्पना सहज होईल. भूक कां लागत नाहीं, याचा विचार न करितां अन्न खाणें म्हणजे शरीरावर निव्वळ दडपशाही करणें होय; म्हणून त्याचें कारण पहिल्यानें शोधून काढून त्याप्रमाणें वागण्याची व्यवस्था ठेवावी. भोजन केव्हां करावें यासंबंधानें आत्रेयादिकांनीं जो काल सांगितला आहे तो असा:- प्रसृष्टे विण्मूत्र हृदि सुविमले दोषे स्वपथगे । विशुद्धे चौद्वारे क्षुदुपगमने वातेऽनुसरति ॥ तथाग्रावुद्रिते विशदकरणे देहे च सुलधौ ॥ प्रयुंजीताहारं विधिनियमितः कालः स हि मतः । अर्थ:-मलमूत्रांचा उत्सर्ग, मनाची प्रसन्नता, दोषांची आपापल्या मार्गीकडे प्रवृत्ति, ढेकरांची शुद्धता, क्षुधेची स्फूर्ति, वायूचें अनुलोमन, अग्रीची प्रदीप्तता, देहलाघव व इंद्रियांचें वैमल्य, इतक्या गोष्टी जेव्हां होतील तेव्हां भोजन करावें. हाच काल भोजनास शास्त्रोत मानला आहे. अन्न किती व कोणत्या प्रकारचें खावें हें ज्याचें त्यानेंच आपल्या नेहमींच्या अनुभवावरून ठरवावें. मात्र त्यांत शरीराला लागणारीं आवश्यक द्रव्यें योग्य प्रमाणांत असलीं पाहिजेत. किल्यकदा जें अन्न एकाला सहज पचतें तें दुस-याला पचविण्यास फार वेळ लागतो किंवा त्यापासून त्याचें नुकसानही होतें. हें सर्व ज्याच्या त्याच्या पचनशक्तीचे सामथ्र्यावर अवलंबून असतें. आपल्याला घरांतील वडील माणसें भुकेपेक्षां दोन घांस कमी खाण्यास जें सांगतात त्याचाही हेतु हाच होय. आर्यवैद्यकांत आमाशयाचे चार भाग कल्यून यांपैकीं दोन भागू अनानें भरावे असें सांगितलें आहे. एकंदरींत, भुकेपेक्षां दोन घांस कमी खावेत यासारखा अग्नि० ५
पान:अग्निमांद्य.pdf/72
Appearance