Jump to content

पान:अग्निमांद्य.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Կv9 कियेकदा या विकारांत तिसरा एक प्रकार दिसून येती तो हा कीं. , अन्न खालें कीं लगेच बहिर्दिशेस जावें लागतें. याचें कारण असें आहे कीं, अन्न खाल्याबरोबर तें पुचविण्यासाठीं आमाशयाची जी हालचाल (चालनमंथनक्रिया) सुरू होते त्या हालचालीचा झोका, ज्याप्रमाणें धोतर वाळविण्यासाठीं एका बाजूनें दिलेला झोका वळकांडें घेत घेत दुस-या बाजूच्या टोंकापर्यंत जातो. त्याच्प्रमाणें, व्ळकांडें घेत घेत तृणजलूकागतीनें गुदापर्यंत जाऊन पोहोंचतो व त्यूमुळे जेवतांक्षणींच बहिर्दिशेस जावें लागतें. असा प्रकार अन्नमार्गाचे मज्जातंतु अशक्त झाल्यानें अन्न पोटांत जातांच प्रतिक्रियेनें होत असतो. या प्रकाराला इंग्रजीत 'लायंटेरिक डायव्हिआ” असें ह्मणतात. मलावरोधः-यापासून आपला समाज बराच त्रासून गेला आहे. हा विकार विशेषेकरून खेडेगांवांतील लोकांपेक्षां शहरांत रहाणा-या लोकांत, गरिबांपेक्षां श्रीमंतांत, मोकळ्या शुद्ध हर्वेत खपणा-या लोकांपेक्षां कोंदट व कचेरींतू एकसारखें बसून काम करणाच्या लोकांत, वनस्पल्याहारी लोकांपेक्षां मांसाहारी लोकांत, अधिक प्रमाणानें दिसून येती. रोजरोज एकाच प्रकारचें अन्न खाणें; चहा, कॉफी, दारू वगैरे गरम व दाहक पेयें पिणें व भांग, गांजा, अफू वगैरे स्तंभक, मादक व शरीरघातक द्रव्यांचें सेवन करणें; यामुळेंही हा जडतो. तसेंच उन्हा- ई - ळ्यापेक्षां थंडीचे दिवसांत हा अधिक होतो. स्थूल व वातबद्ध लोकांसही याची पीडा बरीच होते. कित्येकदा हा विकार आनुवंशिक असतो. कित्येकदा मलशुद्धि नियमित वेळीं करण्याची संवय न ठेवल्यानें, जागरणानें, विशेष श्रमानें किंवा आळशीपणानें बसून राहिल्यानेंही हा विकार जडतो. v मलावरोध हा आंतड्याचा विकार असून तो आंतड्याची तृणजलूकागति ज्या मज्जातंतूंमुळे होते, ते मज्जातंतू अशत झाल्यानें होत असतो. मग ही अशक्तता मार्गे सांगितलेल्या शरीरघातक द्रव्यां