Jump to content

पान:अग्निमांद्य.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

9° खरोखर दुसरा नसतो. अशा रीतीनें दिवसा झोंप घेतल्यानें पचनाला हरकत येते. कारण, अन्न पोटांत गेल्यावर तें चुरडून जिरविण्यासाठीं लागणा-या क्रिया व निरनिराळे पाचकरस ज्या मज्जातंतूंच्या हालचालींनीं होतात त्या हालचाली मेंदू निद्रित स्थितींत राहिल्यानें तितक्या चांगल्या होत नाहींत; व त्यामुळे अन्न न जिरतां अग्रिमांद्य होतें. अशा रीतीनें घडणारा अग्रिमांद्याचा परिणाम जरी शरीरावर कित्येकदा तत्काल घडून आलेला दिसून येत नाहीं तरी तो कधींना कधीं दिसून आल्यावांचून राहत नाही. शरीरांतील अवयवांच्या अंगीं असा कांहीं विलक्षण धर्म असतो कीं, एखादा अवयव नादुरुस्त झाल्यास किंवा आपलें काम करीनासा झाल्यास त्याचें कार्य दुसरे अवयव करीत असतात. परंतु त्यांना देखील आपलें स्वत:चें व नादुरुस्त अवयवाचें असें दुपट काम करावें लागत असल्यामुळे ते कांहीं दिवसांनीं दुबळे होऊन काम करण्यास असमर्थ होतात व त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणें अग्रिमांद्य होतें. म्हणूनच कांहीं लोक दिवसा झोंप घेत असतांना किंवा रात्रीं जागल्यानें देखील ल्यांनां कांहीं झालेलें दिसून येत नाहीं. असें जरी असलें तरी ल्यांनीं पके लक्ष्यांत बाळगावें कों निसर्गाचे नियम उलंधिल्याचें प्रायश्चित्त त्यांस कधींना कधीतरी भोगावें लागणारच.' ' '; आपल्या वैद्यशास्त्रांत यासंबंधानें खालीलप्रमाणें लिहिलें आहे:- अकालेऽतिप्रसंगाच्च न च निद्रा निषेविता । सुखायुषी पराकुर्यात्कालरात्रिरिवापरा ॥ (वा० सू०) अर्थः-अकालीं निद्रा, अतिनिद्रा, व अत्यल्प निद्रा ह्या सुख (अर्थातू आरोग्य ) व आयुष्य यांची हानि करण्यासाठी जशा काय दुस-या कालरात्रीच आहेत. याप्रमाणें वर जीं कारणें सांगितलीं त्यांच्या शिवाय | अकस्मातू एखादी वाईट गोष्ट ऐकणें, हर्षांतिरेक व अशाच ४ अभि०