?く स्त्रीपुरुषांनीं पाश्चात्य लोकांपासून जी अंगाबरोबर तंग कपडे वापरण्याची चाल घेतली आहे तिच्यामुळे, विशेषतः अशा कपड्यांच्या अन्नमार्गावर पडणा-या घट्ट दाबामुळे, पचनक्रियेस अडथळा येतो. उदाहरणार्थ, पाटलुणीवर कमरपटे घट्ट आवळून बांधण्यानें किंवा तंग चोळ्या व पोलके वगैरे वापरल्यानें वर सांगितल्याप्रमाणें फुप्फुस, आमाशय, आंतडी वगैरे इंद्रियांवर दाब पडून अन्नपचनास लागणा-या हालचालींस अडथळा येतो व त्यामुळे अग्रिमांद्य होतें. असाच प्रकार धोतर किंवा लुगडें घट्ट कंबर आवळून नेसल्यानें होत असतो. तसेंच अंगांत कपडे न घालतां थंड हवेंत फिरल्यानें किंवा मळीण कपडे वापरल्यानें देखील अग्रिमांद्य होत असतें. स्नान न केल्यानेंही अप्रल्यक्षरीतीनें अग्निमांद्य उत्पन्न होतें. ७ अयोग्य निद्रा. सगळा दिवसभर काम करून थकल्या भागल्या शरीरास विश्रांति मिळावी म्हणून सृष्टिकर्त्यांनें । झोंपेची योजना केलेली आहे; व त्यासाठीं स्वस्थ व शांत अशी वेळ ह्मटली ह्मणजे रात्र ही होय. रात्रीं सुश्रांत झोंप मिळाल्यानें शरीराला झालेले श्रम परिहार होऊन शरीर पुन: काम करण्यास ताजेंतवानें होतें. परंतु झोंपेंत कांहीं व्ययय आल्यास त्यामुळे शारीरिक व मानसिक क्षीणता उत्पन्न होते व पचनक्रिया बिघडून अग्रिमांद्य होतें. तसेंच फार वेळ झोंप घेत गेल्यानें मज्जातंतू सुस्त होऊन त्यामुळे देखील पचनाला हरकत येते. कित्येकांना तर दिवसा जेवण झाल्यावर निजण्याची संवय असते. अशा लोकांना त्याचें कारण विचारल्यास ते वैद्यकांत जेवण झाल्यावर सांगतात. पण त्या वामकुक्षीचा अर्थ ते ज्याप्रमाणें तासांचेतास निजून काढतात त्याप्रमाणें नसून जेवणानंतर विश्रांति व पचनक्रिया सुलभ व्हावी यासाठी १५-२० मिनिटें अंथरुणावर पडणें यापलीकडे
पान:अग्निमांद्य.pdf/57
Appearance